शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Deepali Chavan Suicide Case: डीएफओ विनोद शिवकुमार बालाचे तोंडावर बोट, दुसरी रात्रही पोलीस कोठडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 05:43 IST

Deepali Chavan Suicide Case: हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेला निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बाला याची सलग दुसरी रात्र धारणी ठाण्याच्या कोठडीत गेली.

धारणी (जि. अमरावती) : हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेला निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बाला याची सलग दुसरी रात्र धारणी ठाण्याच्या कोठडीत गेली. मात्र, पोलीस कोठडीदरम्यान त्याने पोलिसांशी असहकार्याची भूमिका घेतली असून, तो तोंडातून ‘ब्र’ देखील काढत नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. बाला याला अमरावती ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी सकाळी ९ च्या सुुमारास नागपूर रेल्वे स्थानकाहून ताब्यात घेऊन धारणी पोलिसांकडे सुपूर्द केले होते. त्यामुळे शुक्रवारची रात्र त्याला धारणी पोलीस ठाण्यात काढावी लागली.  शनिवारी त्याला न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली. त्याची रविवारची रात्रदेखील सामान्य कैद्याप्रमाणे पोलीस कोठडीत जाणार आहे. त्याला शनिवारी दुपारी दोननंतर धारणी ठाण्यात आणण्यात आले. तेथे सामान्य कैद्याप्रमाणे त्याला ठेवण्यात आले होते. जेवायला शासकीय डबा देण्यात आला. त्यानेही इतर मागणी केली नाही. पोलीस कोठडीजवळ ठाणेदार विलास कुलकर्णी यांनी एक अधिकारी व चार पोलीस कर्मचारी असे पाच जण तैनात केले आहेत.  दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण  गुगामाल वन्यजीव विभागाचे कार्यालय चिखलदरा येथे असून, विनोद बालाचे शासकीय निवासस्थानसुद्धा तेथेच आहे. कार्यालयातून कागदपत्रे व निवासस्थानाहून त्याचा लॅपटॉप व गुन्ह्याशी संबंधित इतरही काही वस्तू जप्त करण्याकरिता त्याला रविवारी दुपारी चिखलदरा येथे नेण्यात आले.  

घटनेचा तपास महिला एसडीपीओंकडे nया प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय काळे यांच्याकडे होता. ते  ३१ मार्चला सेवानिवृत्त होणार  आहेत. nदरम्यान, या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून महिला अधिकाऱ्यांची मागणी झाल्याने विशेष महिला पोलीस तपास अधिकारी म्हणूनमोर्शीच्या उपविभागीय अधिकारी पूनम पाटील यांच्याकडे तपास वर्ग करण्यात आलाआहे. 

टॅग्स :Deepali chavanदीपाली चव्हाणAmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारीforest departmentवनविभाग