शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी दीपक मानकर यांच्यासह दोघांना जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 21:36 IST

मानकर यांच्याकडे गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या जगताप यांनी दोन जून २०१८ साली घोरपडी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती.

ठळक मुद्देमोक्कातून वगळण्याबाबत त्यांना मिळाला नाही दिलासा

पुणे : जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी माजी उपमहापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्यासह दोघांची उच्च न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे. परंतु, मोक्कातून वगळण्याबाबत त्यांना दिलासा मिळाला नाही.याप्रकरणी मानकर आणि सुधर यांनी याचिका दाखल केली होती. मानकर यांच्याकडे गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या जगताप यांनी दोन जून २०१८ साली घोरपडी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मानकर, विनोद रमेश भोळे (वय ३४, रा. घोरपडी पेठ), सुधीर दत्तात्रेय सुतार (वय ३०, रा. कोथरूड), अमित उत्तम तनपुरे (वय २८, रा. मांडवी खुर्द), अतुल शांताराम पवार (वय ३६) आणि विशांत श्रीरंग कांबळे (वय ३०, रा शांतिनगर येरवडा), कुख्यात गुंड नाना कुदळे (रा. केळेवाडी) आणि अजय कंधारे यांना अटक झाली होती. तर बिल्डर सुधीर कर्नाटकी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात दोषारोपपत्र देखील दाखल आहे. मानकरांवर मोक्कानुसार कारवाई करण्याची परवानगी देताना त्यांच्यावर १४ ऐवजी आठच गुन्हे असल्याबाबतचा अहवाल दिल्याप्रकरणी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त व सध्याचे मुंबई रेल्वे आयुक्त रवींद्र सेनगावकर यांची चौकशी करण्याचे आदेश नुकतेच विशेष मोक्का न्यायालयाने दिले होते.सेक्शन २३ प्रमाणे मोक्कासाठी जी परवानगी दिली गेली त्यामध्ये आठ  गुन्हे होते. ते आठ गुन्हे  या टोळी विरोधात पकडले तर यामध्ये मोक्का लागत नसल्याचे नमूद केले होते. याप्रकरणात एकूण १४ गुन्हे होते. त्यातील आठ गुन्ह्यावरती पोलिसांनी मोक्का लागू केल्यानंतर १४ पैकी ८ गुन्हेच का? अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली होती. पोलिसांची चुक असेल तर तुम्हाला का फायदा मिळाला पाहिजे अशीही विचारणा बचाव पक्षाला करण्यात आली होती. त्यावर मोक्काचे कलम २ आणि ३ नुसार तीन पेक्षा जास्त शिक्षा असल्याचा गुन्हा लागतो. बाकीच्या गुन्ह्यात तीन वर्षापेक्षा कमी शिक्षा असल्याने त्यांच्यावर १४ पैकी आठच गुन्ह्यात मोक्का लावण्यात आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या युक्तीवादानंतर न्यायालयाने याप्रकरणी जामीन दिला आहे.- अ‍ॅड. प्रशांत पाटील, दिपक मानकर यांचे वकील.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयPoliceपोलिस