शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

चोरट्यांच्या बेदम मारहाणीत तरुण वाहन चालकाचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 1:49 PM

 कामावर निघालेल्या 23 वर्षीय हायवा चालकास रस्त्यामध्ये अडवून 4 ते 5 चोरट्यांनी बेदम मारहाण केली.

औरंगाबाद  :  कामावर निघालेल्या 23 वर्षीय हायवा चालकास रस्त्यामध्ये अडवून 4 ते 5 चोरट्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास जकात नाका परिसरात घडली. नितीन उर्फ बंडू भीमराव घुगे (वय 23 वर्ष,रा . टी. व्ही सेंटर, जाधववाडी)  असे मृत तरुणाचे नाव आहे.

या प्रकरणी मिळालेली माहिती अशी की, नितीन घुगे टीव्ही सेंटर भागात किरायाने खोली घेउन राहत होता. तो शहरातील एका कंत्राटदारकडे हायवा ट्रक चालविण्याचा काम करत असे. गुरुवारी मध्यरात्री कंत्राटदाराने त्याला  फोन करून  हायवा मध्ये कचरा घेऊन जायचे आहे असे सांगून बोलावून घेतले .त्यानंतर 10 मिनिटात येतो असे  भावाला सांगून तो घराबाहेर पडला. रात्रीचे 2 वाजून गेले तरी नितिन  घरी का आला नाही म्हणून त्याच्या भावाने त्यास कॉल केला असता त्याचा मोबाईल बंद होता. आज सकाळी कंत्राटदाराने बंडूचा अपघात झाल्याचे फोन करून कळविले अशी माहिती मृताचा भाऊ सचिन घुगे यांनी दिली.

मारहाणीमुळे झाला मृत्यू नितिन दुचाकीवरून कामाला जात असताना त्याला जकात नाका परिसरात 4 ते 5 चोरट्यानी अडवून बेदम मारहाण केली. आरडाओरड झाल्याने आरोपी गल्लीबोळातुन पळून गेले. त्यानंतर नितिनने ही घटना कंत्राटदाराला व मित्राला सांगितली . मारहाणीमुळे त्रास होत असल्याने मित्रांनी त्याला घाटी रुग्णालायत दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. अशी माहिती पोलिसांना कंत्राटदार आणि मित्रांनी दिली .

गुन्हेशाखेकडून  पाहणीबाडूच्या हत्येची माहिती प्राप्त होताच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी पथकासह घाटी रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात धाव घेत मृत मृतदेहाची  पाहणी केली मृता च्या हाताला पायाला व शरिरावर मारहाणीच्या जखमा स्पष्ट दिसत आहेत.

भावाने केला संशय व्यक्त...कंत्राटदार व मित्रांनि मला रात्रीच घटनेबाबत सांगायला हवे होते,बंडूच्या खिशातील पाकीट गायब आहे . चोरट्यांनी मारहाण करून लुटले  असते तर मोबाईल कसा ठेवला असता. सकाळी मला अपघात झाल्याचा खोटं बोलण्यात आले - सचिन घुगे, मृताचा भाऊ

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस