बापाने पेटवलेल्या शाहिस्ताची मृत्यूची झुंज संपली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 21:26 IST2019-01-07T21:25:13+5:302019-01-07T21:26:28+5:30
शाहिस्ता मंसुरी (16) असे या मुलीचे नाव असून केईएम रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, तिची मृत्यूची झुंज संपली आहे. याप्रकरणी माथेफिरू वडिलांविरोधात विरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

बापाने पेटवलेल्या शाहिस्ताची मृत्यूची झुंज संपली
वसई - मुलगी सारखी मोबाईलवर बोलते. त्यामुळे तिचे प्रेमप्रकरण असल्याच्या संशयाने पछाडलेल्या पित्याने पेटवलेल्या मुलीचा अखेर मृत्यू झाला. शाहिस्ता मंसुरी (16) असे या मुलीचे नाव असून केईएम रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, तिची मृत्यूची झुंज संपली आहे. याप्रकरणी माथेफिरू वडिलांविरोधात विरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
विरार पूर्वेतील गोपचरपाडा येथे राहणारा मुर्तिजा मंसुरी याचा आपल्या मुलीवर संशय होता. या विकृतीतूनच त्याने गेल्या आठवडय़ात मोबाईलवर बोलणाऱ्या आपल्या मुलीला रॉकेल ओतून पेटवून दिले होते. यात 70 टक्के भाजलेल्या शाहिस्ताची केईएम रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र शनिवारी तिची प्राणज्योत मालवली.