शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठाचा मारहाणीत मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 14:23 IST

लाकडी दांडक्याने केला डोक्यात प्रहार

ठळक मुद्देविश्रांतवाडीतील कळस गाव येथील घटना मृत्यूस कारणीभूत व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

विमाननगर : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना विश्रांतवाडी येथील कळस येथे घडली. भरत काळुराम देवकर (वय ६२) यांचा या भांडणात दुर्दैवाने मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे सुरू होते.सोमवार (दि.२७) रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास विश्रांतवाडी कळस येथील सर्व्हे क्र. ४ माळवाडी येथील शिवाजी देवकर व शेजारी राहणाºया राजेंद्र दरेकर यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. राजेंद्र यांच्या पत्नी शारदा यांनी देवकर यांना शिवीगाळ व मारहाण केली. त्यांचे मोठे बंधू भरत देवकर (वय ६२) हे भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेले असता, शारदा यांनी शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने भरत यांच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत भरत हे जागेवरच कोसळले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ससून रुग्णालयात मंगळवारी सकाळी त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. त्यांच्या पार्थिवावर कळस गाव स्मशानभूमीत येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विश्रांतवाडी पोलिसांनी घटनास्थळी योग्य पोलीस बंदोबस्त ठेवला  होता. याप्रकरणी भरत देवकर यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांना मारहाण करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप यादव करीत आहेत.........भरत देवकर हे निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी, तसेच तीन भाऊ असा मोठा परिवार आहे. येरवड्यातील एस. एस. इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव देवकर यांचे ते लहान बंधू होते. कळस गावातील विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता.

टॅग्स :PuneपुणेVishrantwadiविश्रांतवाडीMurderखूनPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी