शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

फाशीची शिक्षा! सेप्टिक टँकमध्ये सापडलेल्या 9 वर्षीय मुलीच्या बलात्कार, हत्याप्रकरणी कोर्टाने दिला निकाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 21:15 IST

Death Panalty : तिचा मृतदेह तिच्या घराजवळील सार्वजनिक शौचालयाच्या सेप्टिक टाकीत सापडला. याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयाने २०१९ मध्ये घडलेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी निकाल जाहीर केला आहे. २०१९ मध्ये एका ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. नंतर सेप्टिक टँकमध्ये मुलीचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी दोषी आरोपीला दिंडोशी सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. दोषी आरोपीचे नाव गुंडाप्पा चीनतंबी देवेंद्र (३३) असे आहे. एप्रिल 2019 मध्ये जुहू परिसरातून मुलीचे अपहरण झाल्यानंतर काही दिवसांनी तिचा मृतदेह तिच्या घराजवळील सार्वजनिक शौचालयाच्या सेप्टिक टाकीत सापडला. याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नऊ वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण, बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकिलांनी गुरुवारी केली होती. विशेष पॉक्सो न्यायाधीशांनी मंगळवारी देवेंद्रला दोषी ठरवले होते आणि शिक्षेचा निकाल जाहीर करण्यासाठी सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलली होती.

आणखी एका बलात्कार आणि हत्या प्रकरणात, दिंडोशी सत्र न्यायालयाने गुरुवारी एका ४५ वर्षीय दोषी आरोपाला फाशीची शिक्षा सुनावली. सप्टेंबर २०२१ मध्ये मुंबईतील साकीनाका परिसरात ३४ वर्षीय महिलेवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी तो दोषी आढळला होता. आरोपी मोहन चौहान न्यायालयाने 30 मे रोजी भादंवि कलम 302 (हत्या), 376 (बलात्कार) तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या तरतुदीनुसार दोषी ठरवले होते. फिर्यादी पक्षाने चौहानला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. आरोपीने हल्ल्यादरम्यान लोखंडी रॉडचा वापर केला होता. आदेशात न्यायालयाने ही घटना अमानवीय असल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPOCSO Actपॉक्सो कायदाMumbaiमुंबईCourtन्यायालयDeathमृत्यूSexual abuseलैंगिक शोषण