डोंबिवली - पतंग पकडण्याच्या नादात रेल्वे ट्रॅकमध्ये आलेल्या इक्बाल अफजल शेख (११) या चिमुरड्याचा लोकलच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना आज विठ्ठलवाडी स्थानकादरम्यान घडली. मयत इक्बाल हा नजीकच्याच वसाहतीत वास्तव्याला होता. आकाशातून उडालेली पतंग पकडण्याच्या नादात तो रेल्वे रुळात आला आणि संध्याकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यास रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या पोलिस निरिक्षक सुरेखा मेढे यांनी दिली.
पतंग पकडण्याच्या नादात लहानग्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 20:46 IST