परळीत पोलीस स्टेशनजवळ मृतदेह आढळ्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 11:40 IST2019-09-02T11:36:09+5:302019-09-02T11:40:10+5:30

तरुणार तीक्ष्ण हत्याराने वार केल्याच्या खुणा

death body found near the city police station of Parali | परळीत पोलीस स्टेशनजवळ मृतदेह आढळ्याने खळबळ

परळीत पोलीस स्टेशनजवळ मृतदेह आढळ्याने खळबळ

ठळक मुद्देतरुण लातूर येथे होता कामास सोमवारी परतणार होता लातूरला

परळी : शहर पोलिस स्टेशनजवळ हाकेच्या अंतरावर सोमवारी सकाळी एका २२ वर्षीय युवकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अनिल हालगे असे मृताचे नाव असून तो शहरातील गणेशपार भागातील रहिवासी होता. रविवारी मध्यरात्रीनंतर हा खून झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अनिल हालगे हा गेल्या दोन महिन्यांपासून लातूर येथे कामास होता. तो काही दिवसांपूर्वी कामानिमित्त परळीत आला होता. सोमवारी तो लातूरला परत जाणार होता. परंतु, सोमवारी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले आहेत, ही हत्या कोठे आणि कोणी केली तसेच हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. माहिती मिळताच घटनास्थळास परळी शहर व संभाजीनगर पोलिसांनी भेट दिली आहे.

शहरच्या सह्यायक पोलीस निरीक्षक सुरेखा धस, संभाजीनगरचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, व इतर पोलीस अधिकारी उपजिल्हारुग्णात असून मयत अनिल  हालगे यांचे नातेवाईकही रुग्णालयात मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. अनिल हा आई- वडीलास एकुलता एक मुलगा होता.

Web Title: death body found near the city police station of Parali