शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! नराधमांचा मूकबधीर मुलीवर गँगरेप; रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 18:40 IST

Gangrape Case : पीडित मुलगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच आरोपींना पकडण्याचा दावा करत आहेत.

राजस्थानच्या अलवरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नराधम आरोपींनी मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या मुलीला उचलून तिच्यासोबत सामूहिक बलात्कार केल्याची लज्जास्पद घटना घडली आहे. मुलीला बेशुद्धावस्थेत रस्त्यावर फेकून आरोपी फरार झाले. स्थानिक लोकांच्या मदतीने पीडित मुलीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलीच्या गुप्तांगातून रक्तस्त्राव होत होता, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पीडित मुलगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच आरोपींना पकडण्याचा दावा करत आहेत. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचलेजिल्हाधिकारी नन्नू मल पहाडिया आणि अलवरचे एसपी (पोलीस अधीक्षक) तेजस्विनी गौतम यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी मुलीची प्रकृती जाणून घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तिला जयपूरला पाठवले आहे. मुलीच्या गुप्तांगाला धारदार वस्तूने दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जखमा होऊन खूप रक्तस्त्राव झाला होता. 

गुप्तांगाला अनेक जखमामुलीची ओळख पटली आहे, ती फक्त आई आणि वडील इतकंच बोलू शकते. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी पथके पाठवली आहेत. अलवरचे पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी सांगितले की, 5 टीम तयार करण्यात आल्या असून पीडितेच्या काकांच्या वतीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीचे कुटुंबीयही जयपूरला पोहोचले आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात मुलीसोबत क्रौर्याची परिसीमा ओलांडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी रात्रीपासूनच आरोपींचा शोध सुरू केला आहे. मात्र, अद्यापपर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही.पोलीस आरोपींच्या शोधातसायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मुलगी बेपत्ता झाल्याचे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तरुणीच्या आजूबाजूला अनेक ठिकाणी शोध घेण्यात आला. या घटनेने दिल्लीतील निर्भया प्रकरणाची कटू आठवण झाली आहे. त्यानंतर देशात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्कारावरही कडक कायदा करण्यात आला. असे असतानाही मुलींवरील बलात्काराच्या घटना कमी झाल्या नाहीत, अलवरमध्ये अल्पवयीन मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आहे. सध्या पीडिता मृत्यूच्या दाढेत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानPoliceपोलिसsexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषण