मृतदेह सापडल्याने खळबळ, बलात्कार नव्हे ४२ वर्षीय महिलेची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 14:59 IST2020-03-27T14:54:10+5:302020-03-27T14:59:35+5:30
याप्रकरणी एमआरए मार्ग पोलीस अपघाती मृत्यूची नोंद करत पोलीस अधिक तपास करत आहेत.

मृतदेह सापडल्याने खळबळ, बलात्कार नव्हे ४२ वर्षीय महिलेची आत्महत्या
मुंबई - फोर्टमध्ये ४२ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. प्राथमिक तपासात मानसिक तणावातून तिने तिसऱ्या मजल्यावरुन उड़ी घेत आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी एमआरए मार्ग पोलीस अपघाती मृत्यूची नोंद करत पोलीस अधिक तपास करत आहेत.
फोर्ट परिसरातील एका इमारतीत मृत महिला आईसोबत राहण्यास होती. गुरूवारी सकाळी ६ वाजता ती इमारतीच्या खाली रक्ताच्या थारोळ्यात आढळुन आल्याने खळबळ उडाली.या घटनेची वर्दी लागताच महिलेला रुग्णालयात नेले असताना दाखलपूर्व मृत घोषित करण्यात आले. या घटनेनंतर महिलेच्या मृत्यूबाबत बलात्कार करून हत्या केल्याबाबत खोटे संदेश व्हायरल झाले. मात्र, शवविच्छेदन अहवालातून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला नसून, प्राथमिक तपासात तिने आत्महत्या केली असल्याची माहिती परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संग्रामसिंग निशानदार यांनी दिली.