पुणे: महापालिकेजवळ धारधार शस्त्राचे वार करून परप्रांतिय एकाचा खून झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे. खून झालेल्या व्यक्तीचे नाव सुजन मंडल (वय 30) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या नवीन इमारतीसमोर असलेल्या पादचारी पुलावर एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. पश्चिम बंगालचा तो रहिवाशी आहे. त्याच्या डोक्यावर धारधार शस्त्राचे वार करण्यात आले असून मृतदेह नग्नावस्थेत आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे.
पुणे महापालिकेसमोर नग्नावस्थेत सापडला तरुणाचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 18:12 IST