पनवेल येथे सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 20:45 IST2019-12-17T20:43:42+5:302019-12-17T20:45:02+5:30
हा मुलगा पनवेल येथेच राहणारा होता.

पनवेल येथे सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली
पनवेल - काल पनवेल येथील कुंडेवहाळ गावच्या हद्दीत जेएनपीटी रोडच्याकडेला एका अज्ञात लहान मुलाचा मृतदेह आढळून आला होता. एका गोणीमध्ये भरुन या मुलाता मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकण्यात आला होता. पोलिसांना या मृतदेहाची ओळख पटली असून हा मृतदेह सुरज उर्फ मोनू उपेंद्र साही या ७ वर्षीय बालकाचा आहे. हा मुलगा पनवेल येथेच राहणारा होता, अशी माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमा लांडगे यांनी सांगितले.
तसेच लांडगे यांनी पुढे सांगितले की, मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर बालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झालायचे आणि गळा आवळल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील तपास सुरु आहे. मृतदेहाच्या अंगावर ग्रीन टी शर्ट आणि हाफ काळी पॅन्ट घातलेली होती. अशाप्रकारे गोणीमध्ये मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या मुलाची हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून पनवेल शहर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.