धक्कादायक! फ्रिजमध्ये गर्लफ्रेंडचा मृतदेह, दुसऱ्या मुलीशी लग्न, असा झाला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 17:37 IST2023-02-14T17:35:54+5:302023-02-14T17:37:07+5:30
व्हॅलेंटाईन दिवशीच आज दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका प्रियकराने आपल्या गर्लफ्रेंडची हत्या करुन मृतदेह फ्रिजमध्ये ठेवल्याची घटना समोर आली आहे.

धक्कादायक! फ्रिजमध्ये गर्लफ्रेंडचा मृतदेह, दुसऱ्या मुलीशी लग्न, असा झाला खुलासा
व्हॅलेंटाईन दिवशीच आज दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका प्रियकराने आपल्या गर्लफ्रेंडची हत्या करुन मृतदेह फ्रिजमध्ये ठेवल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या व्यक्तीने प्रेयसीचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवून दुसऱ्याच मुलीशी लग्न केले. प्रेयसीने या लग्नाला विरोध केला म्हणून ही हत्या केल्याचे समोर आले आहे. प्रियकराने तिचा गळा आवळून खून केला. कारमध्ये हत्या केल्यानंतर मृतदेह फ्रीजमध्ये लपवून ठेवला.
दिल्लीतील उत्तम नगर येथील एका ढाब्यात ठेवलेल्या रेफ्रिजरेटरमध्ये मृतदेह सापडला. पोलिसांनी आरोपी साहिल गेहलोतला अटक केली आहे.
मंगळवारी दिल्ली पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक तपासानंतरच पोलिसांनी मित्राळ येथील रहिवासी आणि ढाब्याचा मालक साहिल गेहलोत याला अटक केली. प्राथमिक चौकशीत पोलिसांना समोर आले आहे की, आरोपीला दुसऱ्या मुलीशी लग्न करायचे होते, ज्याला पीडित मुलगी विरोध करत होती. कश्मिरे गेट ISBT जवळ कारमध्ये मुलीचा गळा दाबून खून करण्यात आला, त्यानंतर तो मृतदेह घेऊन मित्राळ येथे पोहोचला.
2018 मध्ये या दोघांची मैत्री झाली. पण अलीकडेच साहिलने दुसऱ्या मुलीशी लग्न केले. 10 फेब्रुवारीला लग्न ठरले होते. हा प्रकार तरुणीला समजताच तिने फोन करून लग्न मोडण्यासाठी दबाव टाकला. यादरम्यान दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर मुलीला कारमध्ये घेऊन तो कश्मिरे गेटच्या पार्किंगजवळ पोहोचला. येथे त्याने तिचा गळा आवळून हत्या केली आणि नंतर येथून उत्तम नगर येथे जाऊन मृतदेह ढाब्याच्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवला. 9-10 च्या मध्यरात्री खून केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 10 फेब्रुवारी रोजी आरोपीने लग्न केले. या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.