मुलुंडमध्ये सापडला अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 15:42 IST2019-01-29T15:38:28+5:302019-01-29T15:42:09+5:30
मृदेहाच्या छातीवर आणि मानेवर वार असल्याने त्याची हत्या करून त्याचा मृतदेह इथे आणून टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेणं सुरु आहे.

मुलुंडमध्ये सापडला अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह
मुंबई - मुलुंड पूर्व येथील टाटा कॉलनी केळकर कॉलजेच्यामागे गवतात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. या मृदेहाच्या छातीवर आणि मानेवर वार असल्याने त्याची हत्या करून त्याचा मृतदेह इथे आणून टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेणं सुरु आहे.
मुलुंड येथील टाटा कॉलनी केळकर कॉलेजमधील एका कर्मचाऱ्याला प्रथम या गवतात एका इसमाचा पाय दिसला. कोणी व्यक्ती या निर्मनुष्य आणि मोठ्या प्रमाणात गवत असलेल्या ओसाड भागात पडलेला कसा? असा संशय आल्याने त्याने तात्काळ याची माहिती नवघर पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच नवघर पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्यासह पोलीस उपायुक्त अखिलेश कुमार सिंग, गुन्हे शाखेचे अधिकारी , डॉग स्कॉड घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. मृत्यूदेहाच्या छातीवर आणि मानेवर धारधार शस्त्राचे वार असल्याने त्याची हत्या करून इथे आणून टाकल्याची शक्यता आहे. ३० ते ४० वयोगटातील मृत इसमाच्या अंगावर निळे टीशर्ट आणि राखाडी रंगाची ट्रॅक पॅन्ट आहे. मृतदेह काही प्रमाणात कुजलेल्या स्थितीत असल्याने सध्या पोलीस या मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत असून त्यानंतर पुढील तपासाला गती येणार आहे. परंतु यामुळे या विभागात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.