शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा शहरात भरदिवसा चोरी; २५ लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 12:19 IST

Burglary in Karanja city; पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : कारंजा येथील गुरुदेवनगरात अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा एक घर फोडून २५.५० लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना २५ एप्रिल रोजी सायंकाळी पावणेसहा वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. दरम्यान, घरमालकाच्या फिर्यादीवरून कारंजा शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. कारंजा शहरातील बायपास परिसरातील गुरुदेवनगरात नगरे दाम्पत्य राहत असून ते कारंजा तालुक्यातील रामनगर येथील जि. प, शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहे. २५ एप्रिल रोजी नगरे दाम्पत्य दारव्हा तालुक्यातील हरूगोंडेगाव येथे अत्यावश्यक कामासाठी गेले होते. त्यानंतर सायंकाळी ५.५० वाजता ते घरी परत आले असता घराचे मुख्य प्रवेशद्वार लावल्याचे, तर घराचे दरवाजे थोडे उघडे असल्याचे व दाराचे कुलूप खाली पडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर घरात जाऊन पाहणी केली असता बेडरूममधील दोन खाण्याची रॅक उघडी दिसली. अज्ञात चोरट्यांनी सोन्याचा ७५ ग्रॅम वजनाचा राणीहार, १२० ग्रॅम वजनाच्या चार पाटल्या, २७ ग्रॅम वजनाच्या तीन अंगठ्या, २७ ग्रॅम वजनाचा राणीहार असे नवीन ठेवलेले दागिने व ५० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, ३० ग्रॅम वजनाचा सोन्याचा पोहेहार, ५२ ग्रॅम वजनाची दोन नेकलेस व अन्य दागिने असा एकूण २५ लाख ५० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर  हात साफ केला. घरमालक मोतीराम तुकाराम नगरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भांदविच्या कलम ४५४ व ३८० नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा अधिक तपास ठाणेदार पाटील यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस करीत आहे. दरम्यान, चोरीच्या तपासासाठी श्वानपथक व ठसेतज्ज्ञांची मदत घेण्यात आली; परंतु त्यात यश आले नाही. शहरात कोरोना लॉकडाऊनच्या काळात दिवसाढवळ्या चोरी झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी कारंजा येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली व तपासाबाबत पोलिसांना आवश्यक त्या सूचना केल्या.(प्रतिनिधी)

टॅग्स :KaranjaकारंजाCrime Newsगुन्हेगारी