शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

दाऊद टोळीतील अट्टल गुन्हेगार पुण्यात जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 12:00 IST

गेली ५ ते ६ वर्षे तो पुण्यात आपली ओळख लपवून राहत होता.

ठळक मुद्दे दहिसर पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, मारामारी,खंडणी असे ४० ते ४५ गुन्हे दाखल

पुणे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीतील सराईत गुन्हेगाराला विश्रांतवाडी पोलिसांनी गुरुवारी अटक केली. संतोष गोपाळ नायर (वय ४५, रा़ टिंगरेनगर) असे त्याचे नाव आहे. गेली ५ ते ६ वर्षे तो पुण्यात आपली ओळख लपवून राहत होता. पोलिसांनी त्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या हवाली केले आहे.संतोष गोपाळ नायर हा सराईत गुन्हेगार २००४ पासून दरोड्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबईत दाखल असलेल्या गुन्ह्यात फरार होता. त्याच्यावर दहिसर पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, मारामारी,खंडणी असे ४० ते ४५ गुन्हे दाखल आहेत. मात्र २००४ साली त्याने मुंबईत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तो फरार झाला होता. तो मागील ५ ते ६ वर्षांपासून पुण्यात राहत होता. तो मोबाईल वापरत नव्हता. पत्नीच्या नावावरच तो मोबाईल वापरत होता. तसेच आपली ओळख लपविण्यासाठी तो पुण्यात लोकांमध्ये मिसळत नव्हता. तो कोणाशीही संपर्क ठेवत नव्हता. त्याने विमाननगर भागात खानावळ सुरु केली होती. मुंबई पोलीस दलातील गुन्हे शाखेने त्याच्याबाबत विश्रांतवाडी पोलिसांना माहिती दिली़ त्यानंतर अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते, कर्मचारी संजय कांबळे व भोर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीDawood Ibrahimदाऊद इब्राहिमPoliceपोलिसArrestअटक