धक्कादायक! आईची हत्या करून दोन मुलींनी घेतला गळफास; मृतदेह ४ दिवस घरातच पडून होते

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 03:34 PM2021-06-06T15:34:54+5:302021-06-06T16:48:14+5:30

घटनास्थळी पोहचलेले पोलीस अधिकारी अभिषेक श्रीवास्तव, केके तिवारी यांनी जेव्हा घराचा दरवाजा उघडला तेव्हा आतमधील दृश्य पाहून सगळेच हैराण झाले.

Daughters Hanged Herself After Murder Her Mother In Firozabad | धक्कादायक! आईची हत्या करून दोन मुलींनी घेतला गळफास; मृतदेह ४ दिवस घरातच पडून होते

धक्कादायक! आईची हत्या करून दोन मुलींनी घेतला गळफास; मृतदेह ४ दिवस घरातच पडून होते

googlenewsNext
ठळक मुद्देदोन्ही बहिणीचं लग्न झालं नव्हतं. लग्नाचा विषय काढला की त्या दोघीही आधी करिअर करायचं आणि नंतर लग्न असं म्हणत होत्या. आई आणि बहिणीच्या मध्ये वारंवार वाद सुरू होते अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकारी अशोक कुमार यांना घटनास्थळी मिळाली.आई आणि मुली इतर कोणाचीही काही संबंध ठेवत नव्हते. त्यामुळे त्यांच्या घरी गावातील कोणीही येत जात नसायचे

फिरोजाबाद – उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे आईसोबत वेगवेगळ्या घरात राहणाऱ्या दोन मुलींनी एका क्रूर घटना केली आहे. आईच्या डोक्यात हल्ला करून दोन्ही मुलींनी एकाच साडीला लटकून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तात्काळ ते घटनास्थळी पोहचले. तेव्हा घराचा दरवाजा तोडून हे मृतदेह बाहेर काढले. एकाच कुटुंबातील ३ मृतदेह पाहून गावात खळबळ माजली आहे.

नारखी धौंकल येथील रहिवासी विमला देवी उर्फ विमलेश दोन मुली एक २४ वर्षीय ममता आणि दुसरी २० वर्षीय रेणूसोबत एकाच घरात राहत होती.तर पती वेदराम हा रजावली पोलीस चौकी परिसरात एका रुममध्ये राहत होता. तो मजुरी करून स्वत:चं पोट भरत होता. त्यांची तिन्ही मुलं वेगवेगळी राहत होती. शनिवारी रात्री गावातील एका घरातून खूप दुर्गंध येऊ लागल्यानंतर स्थानिकांनी याबाबत पोलिसांना माहिती कळवली.

घटनास्थळी पोहचलेले पोलीस अधिकारी अभिषेक श्रीवास्तव, केके तिवारी यांनी जेव्हा घराचा दरवाजा उघडला तेव्हा आतमधील दृश्य पाहून सगळेच हैराण झाले. एकीकडे जमिनीवर आईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता तर दुसरीकडे दोन्ही मुलींचा मृतदेह एका साडीच्या साहय्याने लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. या मृतदेहातून दुर्गंध येत होता. आईच्या डोक्यात जबर मारहाण झाली होती. तिच्या मृतदेहाशेजारी सगळीकडे रक्त सांडले होते.

गावात राहणाऱ्या मृत आईचा मुलगा शैतान सिंहने सांगितले की, त्यांच्या दोन्ही बहिणीचं लग्न झालं नव्हतं. लग्नाचा विषय काढला की त्या दोघीही आधी करिअर करायचं आणि नंतर लग्न असं म्हणत होत्या. मोठ्या बहिणीला बीएससीनंतर बीटीसी करायचं होतं तर छोटी बहिणी बीए पास झाली होती. आई आणि बहिणीच्या मध्ये वारंवार वाद सुरू होते अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकारी अशोक कुमार यांना घटनास्थळी मिळाली.

४ दिवसांपासून मृतदेह घरातच

पोलिसांच्या माहितीनुसार, जवळपास ४ दिवसांपासून हे मृतदेह घरातच असल्याचं दिसून येते. आई आणि मुली इतर कोणाचीही काही संबंध ठेवत नव्हते. त्यामुळे त्यांच्या घरी गावातील कोणीही येत जात नसायचे. एसएसपीच्या म्हणण्याप्रमाणे मुलींचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला तर आईचा मृतदेह जमिनीवर पडलेला सापडला. त्यामुळे प्रथमदर्शनी आईची हत्या करून मुलींनी स्वत: आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र तरीही पोलिसांचा तपास सुरू आहे.   

Web Title: Daughters Hanged Herself After Murder Her Mother In Firozabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस