मच्छी बनवता येत नसल्याने सुनेची केली सासरच्यांनी हत्या, मार्चमध्ये झाले होते लग्न

By पूनम अपराज | Published: November 18, 2020 07:17 PM2020-11-18T19:17:46+5:302020-11-18T19:18:35+5:30

Murder : खून केल्यानंतर महिलेचा मृतदेह पोत्यात भरून ठेवला होता, त्यानंतर सासरच्यांनी गावाजवळील कालव्याजवळ पोतं फेकलं. 

Daughter in law killed due to not coming to cook fish, married in March month | मच्छी बनवता येत नसल्याने सुनेची केली सासरच्यांनी हत्या, मार्चमध्ये झाले होते लग्न

मच्छी बनवता येत नसल्याने सुनेची केली सासरच्यांनी हत्या, मार्चमध्ये झाले होते लग्न

googlenewsNext
ठळक मुद्देमहिलेची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी आरोपी पती आणि इतर सासरच्या लोकांविरुद्ध एफआयआर नोंदविला आहे.

बिहारच्या सुपौलमध्ये मच्छी बनवता आली नसल्यामुळे सुनेला सासरच्यांनी ठार मारले. खून केल्यानंतर महिलेचा मृतदेह पोत्यात भरून ठेवला होता, त्यानंतर सासरच्यांनी गावाजवळील कालव्याजवळ पोतं फेकलं. 

जेव्हा माहेरच्या मंडळीला महिलेविषयी कोणतीही माहिती मिळाली नाही, तेव्हा त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. लोकांनी माहितीवरून पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. महिलेची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी आरोपी पती आणि इतर सासरच्या लोकांविरुद्ध एफआयआर नोंदविला आहे.

कोसी नदीवर मृतदेह सापडला

रतनपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोसी पूर्व तटबंध  ढांढा   गावाजवळ कोसी नदीच्याआधी दोन दिवसापुर्वी पोत्यात भरलेला महिलेचा मृतदेह सापडला. लोकांकडून माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून  महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. तसेच तिची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न केले गेले. जर महिलेची ओळख पटली तर त्या महिलेच्या मृत्यूचा गुंता देखील सुटेल.

सुनीला देवी असे या महिलेचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी या महिलेच्या घरातील सदस्यांनी तिच्याबाबत पोलीस ठाण्यात हरवल्याबाबत तक्रार दाखल केली होती. महिलेचा मृतदेह पाहून कुटुंबातील सदस्यांना धक्का बसला आहे. त्याचवेळी सुनिला देवीचे वडील विशुनदेव पासवान  (राहणारे मटीयारी) यांनी पोलिसांना सांगितले की, मार्च 2020 मध्ये मुलीचे लग्न शैतानपट्टी पंचायतीच्या  ढांढा    गावात राहणारे अमलेश पासवान याचा मुलगा शेष पासवान याच्याशी झाले होते.

दिवाळीनंतर मामा मुलीकडे गेले असता ती सासरच्या घरात सापडली नाही. जेव्हा आम्हाला सासरच्या लोकांकडून याची माहिती मिळाली, तेव्हा सासरच्या लोकांना अनेक करणे देण्यास सुरुवात केली.यानंतर, तिच्यावर काही अनुचित प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करत माहेरच्या लोकांनी रतनपूर पोलिस ठाण्यात सुनीला देवी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. 


रविवारी पूर्व कोसी तटबंदीच्या  ढांढाजवळ कोसी नदीत पोत्यात अडकलेल्या महिलेचा मृतदेह आढळला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून याबाबत विशुनदेव यांना माहिती दिली. मृत मुलीच्या वडिलांना त्यांची मुलगी असल्याचे ओळखले. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी रस्ता रोको करून खळबळ माजवली. पोलिसांनी लोकांना समजून सांगितलं  आणि प्रकरण मिटवलं. महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे.

नवरा आणि सासऱ्याला अटक

पोलिसांनी आरोपी पती शिवेश कुमार आणि सासरे अमरेश पासवान यांना काल रात्री छापा टाकून रतनपुरा भागातून अटक केली. पोलिसांनी आरोपी पतीची चौकशी केली असता त्याने पत्नीची हत्या करून प्रेत नदीत फेकल्याचे कबूल केले. त्याचवेळी हत्येचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की, पत्नी सुनिला देवी मासेमच्छी बनवू शकत नाही, या प्रकरणावरून वाद निर्माण झाला आहे. वादाच्या वेळी सुनीलाने आपल्या पतीशी वाद घालण्यास सुरुवात केली, यामुळे पती संतापला आणि त्याने पत्नीची हत्या केली. या घटनेत शिवेशच्या आई आणि वडिलांनीही पाठिंबा दर्शविला. पोलिस प्रमुख रतनपुरा रणवीर कुमार राऊत यांनी सांगितले की, तिघांची चौकशी केल्यानंतर त्यांना तुरूंगात पाठविण्याची कारवाई केली जात आहे.

Web Title: Daughter in law killed due to not coming to cook fish, married in March month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.