प्रेमाला विरोध केल्यानं मुलीनं केली आईची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 18:06 IST2018-12-26T18:05:09+5:302018-12-26T18:06:08+5:30

हत्येप्रकरणी मुलीसह प्रियकराला अटक

Daughter Killed mother after she Did Not Accepted Relationship | प्रेमाला विरोध केल्यानं मुलीनं केली आईची हत्या

प्रेमाला विरोध केल्यानं मुलीनं केली आईची हत्या

चेन्नई: तमिळनाडूतील तिरुवल्लूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आईनं प्रियकरासोबतच्या नात्याला मान्यता न दिल्यानं मुलीनं आईची हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी तरुणी, तिचा प्रियकर आणि दोघांना अटक केली आहे. 

आरोपी एस. देवप्रिया एका खासगी महाविद्यालयात बी. कॉमचं शिक्षण घेत आहे. देवप्रियानं सोमवारी तिच्या कक्कालूरमधील राहत्या घरी चाकू भोसकून आईची (भानुमती) हत्या केली. यानंतर लगेचच भानुमती यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्याच रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

आपल्या प्रेमसंबंधाला आईचा विरोध असल्याची माहिती देवप्रियानं प्रियकराला दिली होती, असं पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर प्रियकरानं आईची हत्या करण्यासाठी देवप्रियाला भडकावलं. आईची हत्या करण्यासाठी देवप्रियानं मित्र विघ्नेश आणि अजित कुमार यांची मदत घेतली. त्यामुळे भानुमती यांच्या खून प्रकरणी देवप्रियासोबत तिचा प्रियकर आणि दोन मित्रांनादेखील अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 

Web Title: Daughter Killed mother after she Did Not Accepted Relationship