सुनेला नखाने ओरबडत घेतला चावा, आठ जणांवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा 

By रूपेश हेळवे | Updated: March 24, 2023 16:15 IST2023-03-24T16:14:48+5:302023-03-24T16:15:12+5:30

फिर्यादी आयेशा शेख यांचे रफिक शेख याच्याशी वर्षापुर्वी विवाह झाला होता.

Daughter-in-law scratched and bitten by fingernails, family violence against eight people | सुनेला नखाने ओरबडत घेतला चावा, आठ जणांवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा 

सुनेला नखाने ओरबडत घेतला चावा, आठ जणांवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा 

सोलापूर : वाद झाल्याने तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात जाणार्या सुनेला, सासूने चेहर्यावर, हाता-पायवर ओरबडत चावा घेतल्या प्रकरणी सासूसह आठ जणांवर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत आयेशा रफिक शेख ( वय ३४, रा. मुरारजी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी आयेशा शेख यांचे रफिक शेख याच्याशी वर्षापुर्वी विवाह झाला होता. दरम्यान, सासू सोबत झालेल्या वादातून आयेशा शेख या तक्रार देण्यासाठी जाताना सासू शमा सिराज शेख यांनी आयेशा यांना शिवीगाळ करत तुला लय मस्ती आली आहे. तू माझ्या मुलीची तक्रार देण्यासाठी पोलिसात जाते का म्हणत नणंद आस्मा पठाण व सासू यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवाय त्यांच्या चेहर्यावर हाता पायावर नखाने ओरबडले.

याप्रकरणी आरोपी पती रफिक सिराज शेख, सासू शमा शेख, सासरे सिराज शेख, नणंद आस्मा पठाण, रेश्मा सिराज शेख, शब्बीर शेख, सूफिया अमिन आगा, अमीर आगा ( सर्व रा. सांगवी, बारामती) यांनी घालून-पाडून बोलत शिवीगाळ करत, दमदाटी केली. शिवाय लाथाबुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादीचा जाचहाट केला, अशा आशयाची फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून वरील सर्व आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास नरेश कामूर्ती करत आहेत.

Web Title: Daughter-in-law scratched and bitten by fingernails, family violence against eight people