आईकडे कर्ज वसुलीसाठी येत होता एजंट, मुलगी पडली प्रेमात अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2021 14:46 IST2021-11-06T14:40:58+5:302021-11-06T14:46:20+5:30
Daughter fell in love with recovery agent : मिळालेल्या माहितीनुसार, रितू नावाची मुलगी झारखंडमधील हजारीबागची रहिवासी आहे, तर अमर नावाचा तरुण बराडीहमध्ये राहतो.

आईकडे कर्ज वसुलीसाठी येत होता एजंट, मुलगी पडली प्रेमात अन्...
नवी दिल्ली : कर्जाची परतफेड न केल्याने लोकांशी गैरवर्तन केल्याचे तुम्ही ऐकले असेलच. पण झारखंडमधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे, याठिकाणी कर्ज वसुली एजंट कर्ज घेतलेल्या महिलेच्या मुलीच्या प्रेमात पडला. या प्रेमापोटी तो तरुण मुलीसह बिहारला पळून गेला. बिहार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची प्रेमकहाणी समोर आली.
मिळालेल्या माहितीनुसार, रितू नावाची मुलगी झारखंडमधील हजारीबागची रहिवासी आहे, तर अमर नावाचा तरुण बराडीहमध्ये राहतो. दोघेही चार महिन्यांपूर्वी झारखंडमधून पळून फुलवारी शरीफ येथे आले होते. तरुण हजारीबाग येथील एका खासगी फायनान्स कंपनीत कामाला होता. त्याने वर्षभरापूर्वी प्रेयसीच्या आईला कर्ज दिले होते. मुलीची आई कर्ज फेडण्यास असमर्थ होती. कर्जाचे पैसे वसूल करण्यासाठी तरुण मुलीच्या घरी जात असे. यादरम्यान तो तरुणीच्या संपर्कात आला. दोघांमध्ये प्रेम संबंध जुळले आणि दोघांनीही एकमेकांसोबत जगण्या-मरण्याची शपथ घेतली.
दोघांचे मंदिरात लग्न
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अमर या तरुणाने मुलीशी लग्न करण्यास नकार दिला. यानंतर मुलीने फुलवारी शरीफ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघांची समजूत काढल्यानंतर त्यांचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी फुलवारी शरीफ येथील शिवमंदिरात दोघांचे लग्न लावून दिले. दोघेही झारखंडला परतले असल्याचे पोलिसांनी सांगितले.