शहरं
Join us  
Trending Stories
1
एक्झिट पोलवर सोनिया गांधी यांची पहिली प्रतिक्रिया! जाणून घ्या, काय म्हणाल्या?
2
Mumbai Local: मुंबईकरांची आठवड्याची सुरुवात लेटमार्कने! पश्चिम रेल्वे विस्कळीत, बोरीवलीत तांत्रिक बिघाड
3
शहाजीबापू पाटील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात; CM एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, केली तब्येतीची विचारपूस
4
Fact Check : राहुल गांधी पुढचे पंतप्रधान होतील असा दावा करणारी शाहरुख खानची 'ती' पोस्ट खोटी
5
अंध:कार दूर होणार, मोदी जाणार, भाजपा २२५ वर अडणार, तर इंडिया आघाडी..., सामनाचा दावा
6
T20 WC 2024 : पोलार्ड इंग्लंडच्या ताफ्यात! गतविजेत्यांना पुन्हा एकदा चॅम्पियन करण्यासाठी मैदानात
7
Anil Ambaniच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी; रिलायन्स पॉवर, इन्फ्रामध्ये जोरदार वाढ; जाणून घ्या?
8
Gold Price Today: ३ जून रोजी स्वस्त झालं Gold, निवडणुकांच्या निकालापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घसरण
9
“NDAत येण्यासाठी उद्धव ठाकरेंचा PM मोदींना अनेक लोकांच्या माध्यमातून मेसेज”; शिंदे गटाचा दावा
10
OMA vs NAM : नामिबियाचा 'सुपर' विजय! ओमानची कडवी झुंज; केवळ ११० धावा पण सामना गाजला
11
“थोरातांची वैचारिक दिवाळखोरी दिसून येते, स्वतःला नेते समजतात पण...”: राधाकृष्ण विखे पाटील
12
रवीना टंडनवर झालेल्या खोट्या आरोपांवर कंगना रणौतची प्रतिक्रिया, म्हणाली, "ही धोक्याची घंटा..."
13
Exit Poll सुद्धा 'कन्फ्युज'! महाराष्ट्राचा नेमका कौल असणार तरी काय?
14
आरोग्य सांभाळा! जास्त तहान लागत असेल तर सावधान; 'या' ५ आजारांचा वाढू शकतो धोका
15
अल्लाह तुमच्या सर्व समस्या जाणून आहे, त्यामुळे संयम ठेवा; Sania Mirza ची पोस्ट
16
Share Market : शेअर बाजाराला 'एक्झिट पोल'चा बूस्टर; सेन्सेक्समध्ये २६०० अंकांपेक्षा अधिक तेजी
17
"EVM मध्ये छेडछाड झाली नाही तर हिमाचलमधील चारही जागा काँग्रेसला मिळतील"
18
NAM vs OMA : WHAT A MATCH! ओमानने नामिबियाच्या तोंडचा घास पळवला, Super Over मध्ये निकाल
19
अनेक वर्षे होती सत्ता, पण या राज्यात काँग्रेसला उमेदवार मिळेनात, ४१ जागांवर केलं सरेंडर
20
लग्नमंडपात पसरली शोककळा; मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू, 15 जखमी

दत्ता पडसलगीकर बनले उपलोकायुक्त; प्रस्तावाला राज्यपालाची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 10:01 PM

पोलीस दलात ३७ वर्षे सेवा बजाविल्यानंतर दत्ता पडसलगीकर २८ फेबु्रवारीला सेवानिवृत्त झाले होते.

ठळक मुद्देराज्य सरकारने त्यांच्या नियुक्तीबद्दल बनविलेल्या प्रस्तावाला राज्यपाल विद्यासागर राव यांनी बुधवारी हिरवा कंदील दाखविला आहे.त्यांच्या नियुक्तीबाबतच्या प्रस्तावाला राज्यपाल विद्यासागर राव यांनी बुधवारी स्वाक्षरी करीत शिक्कामोर्तब केले.

जमीर काझीमुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून सहा दिवसापूर्वी पायउतार झालेले दत्ता पडसलगीकर यांचा पुन्हा शासकीय सेवेत रुजू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्थात ते पुन्हा पोलीस अधिकारी म्हणून नव्हे तर उप लोकायुक्त म्हणून जनतेची गाऱ्हाणे सोडविणार आहेत. राज्य सरकारने त्यांच्या नियुक्तीबद्दल बनविलेल्या प्रस्तावाला राज्यपाल विद्यासागर राव यांनी बुधवारी हिरवा कंदील दाखविला आहे.पोलीस दलात ३७ वर्षे सेवा बजाविल्यानंतर दत्ता पडसलगीकर २८ फेबु्रवारीला सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर आठवड्याभरातच राज्य सरकारने त्यांच्यावर नवीन जबाबदारी सोपविली आहे. १९८२ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असलेल्या पडसगलीकर यांची गेल्यावर्षी ३० आॅगस्टला पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र या पदावर त्यांना केवळ दोन महिन्याचा कार्यकाळ मिळत असल्याने राज्य सरकारने त्यांना दोन टप्यात प्रत्येकी तीन महिन्याची मुदतवाढ दिली होती. त्याशिवाय त्यांना जून २०२० पर्यत पोलीस महासंचालक म्हणून मुदतवाढ देण्यात यावी, असा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविला होता. मात्र त्यांच्या मुदतवाढीबद्दल अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकारी नाराज असल्याने त्याला न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता होती. त्यामुळे केंद्राने राज्य सरकारचा प्रस्ताव नाकारला होता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील पडसलगीकर यांना २८ फेबु्रवारीला पदावरुन पायउतार होण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मात्र रिटायरमेंट नंतरही राज्य सरकारने त्यांना उपलोकायुक्त बनवून त्यांच्यावर पुन्हा महत्वाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या नियुक्तीबाबतच्या प्रस्तावाला राज्यपाल विद्यासागर राव यांनी बुधवारी स्वाक्षरी करीत शिक्कामोर्तब केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस