शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोगनोळी धाडसी दरोडा, घरात येऊन मारहाण करत दागिने लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 13:34 IST

घरातील व्यक्तींना मारहाण करून दागिने व रोकड लंपास

बाबासो हळिज्वाळे

कोल्हापूर -  जिल्ह्यातील कोगनोळी येथे एकाच रात्रीत पाच घरे फोडून घरातील व्यक्तींना मारहाण करून तीस तोळे दागिने व रोकड दरोडेखोरांनी लंपास केल्याची घटना रविवारी पहाटे घडली. येथील हणबरवाडी रोडवर असणाऱ्या रेणुका मंदिरानजीक शिक्षण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी सी. वाय. पाटील यांची इमारत आहे. घरातील पाठीमागील दरवाजा उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला व घरातील पाटील, त्यांची पत्नी रेखा पाटील व मुलगी ऐश्वर्या घोरपडे यांना जबर मारहाण केली. त्यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर घरातील तीस तोळे दागिने व रोकड लंपास केली. या घराबरोबरच गावातील इतरही आणखी काही घरांमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला. या घटनेमुळे कोगनोळीसह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच चिकोडी विभागाचे पोलीस उपाधीक्षक बसवराज यलगार, मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुंभार यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून श्वानपथक व ठसे तज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. एकाच रात्रीत पाच ठिकाणी धाडसी दरोडा व कुटुंबातील सदस्यांना होणारी मारहाण यामुळे कोगनोळी व परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या मोठ्या दरोड्यातील दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसThiefचोर