पुणे : स्वारगेट येथील कात्रज बसस्टॉपजवळ महिलांच्या शेजारी मोटारसायकलवर संशयास्पदरित्या थांबलेल्या दोघा तरुणांना रात्री पेट्रोलिंग करणाऱ्या दोघा दामिनींनी त्यांचा संशय आला़. त्यांनी त्यांना हटकले असता त्यांच्यातील एक जण पळून गेला असून एकाला पकडण्यात आले आहे़. त्याच्याकडील गाडी वडगाव मावळ येथून चोरली असल्याचे आढळून आले आहे़.ही कामगिरी जयश्री भालेराव आणि एस बी रणशिंग या दामिनी मार्शलनी ही कामगिरी केली आहे़. रात्री रस्त्यावरील वाहतूक कमी झाल्यावर अनेक गैरप्रकार होत असतात़. एकट्या दुकट्या जाणाऱ्या तरुणी, महिलांना त्रास देण्याच्या प्रकार होत असतो़. त्याला आळा घातला जावा, यासाठी शहरातील महत्वाच्या ठिकाणी दामिनी पथकाकडून पायी पेट्रोलिंग केले जाते़. त्यानुसार स्वारगेट पोलीस ठाण्यातील दामिनी मार्शल जयश्री भालेराव व रणशिंग या बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास स्वारगेट येथील कात्रजकडे जाणाऱ्या बसस्टॉपजवळ पेट्रोलिंग करीत आल्या़. बसस्टॉपवर काही महिला बसची वाट पाहत होत्या़. त्यांच्याजवळच दोघे जण एका मोटारसायकलवर बसलेले दिसले़. ते गुन्हा करण्याच्या तयारीत असावे, असा त्यांना संशय आला़. त्यांनी त्या दोघांना हटकले़. त्यांच्याकडे लायसन्स नव्हते़. त्यांच्या मोटारसायकलवर नंबर प्लेटही दिसली नाही़.
दामिनी मार्शलनी पकडले मोटारसायकल चोरट्याला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 14:34 IST