दहिसर पोलिसांची कारवाई; महागड्या सायकली चोरणारा चर्तुभूज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 20:27 IST2019-09-10T20:26:20+5:302019-09-10T20:27:41+5:30
२२ सायकली जप्त

दहिसर पोलिसांची कारवाई; महागड्या सायकली चोरणारा चर्तुभूज
मुंबई - दहिसर पोलिसांनी दोघा सराईत चोरट्याला अटक करुन त्याच्याकडील महागड्या २२ सायकली जप्त केल्या. गणेशराम अभिलेश तिवारी उर्फ राजू चव्हाण (वय ४८, रा. संतोष भवन, नालासोपारा) असे त्याचे नाव आहे. या सर्व गियरच्या सायकली असून त्याची किंमत अडीच लाख रुपये आहे.
तिवारीकडून दहिसर परिसरातील चार गुन्हे उघडकीस आले आहेत. शहर व उपनगरातील आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दहिसर चेक नाका येथे सायकल चोरटा येणार असल्याची माहिती दहिसर पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. वरिष्ठ निरीक्षक एम.एस. मुजावर यांच्या सुचनेनुसार उपनिरीक्षक श्रीकांत मगर,डॉ. चंद्रकांत घार्गे,आदीच्या पथकाने परिसरात पाळत ठेवली. संशयास्पदरित्या फिरत असलेल्या गणेशराम तिवारी याला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने चोरलेल्या २२ सायकलीची कबुली दिली.