शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

दहिसर ज्वेलर्स हत्या आणि दरोडा प्रकरण; मास्टरमाईंडसह दोघांच्या मुसक्या आवळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 18:57 IST

Dahisar Jewelers murder and dacoity case : सुरतच्या पिठमपूर जंगलातून घेतले ताब्यात

ठळक मुद्देपाटीदारच्याच इशाऱ्यावरून लूट करण्याच्या उद्देशाने पांडेंची हत्या करणाऱ्या आयुष पांडे (१९), निखिल चांडाल (२१), उदय बाली (२१) चिराग रावल (२१) आणि अंकित महाडिक (२१) या पाच जणांना यापूर्वी सुरत जवळून अटक करण्यात आली होती. पाटीदार हा हत्या आणि दरोड्याच्या घटनेच्या २५ दिवस आधी मुंबईत आला आणि त्याने रेकी करत मारेकऱ्यांना सर्व प्लॅन समजावला आणि तो मुंबईतून परतला होता.

गौरी टेंबकर - कलगुटकर

मुंबई: सोनार शैलेंद्र पांडे (४६) यांच्या दुकानात शिरून थेट त्यांना गोळी घालत लुटपाट करा असे सांगत शूटर्सना पाठविणाऱ्या बंटी पाटीदार (२३) याच्यासह त्याचा साथीदार प्रमोद लखरिया (२२) याच्या मुसक्या देखील रविवारी दहिसर पोलिसांनी सुरतच्या पिठमपूर जंगलातुन आवळल्या आहे.पाटीदार हा हत्या आणि दरोड्याच्या घटनेच्या २५ दिवस आधी मुंबईत आला आणि त्याने रेकी करत मारेकऱ्यांना सर्व प्लॅन समजावला आणि तो मुंबईतून परतला होता. तर त्याचा साथीदार प्रमोद लखरिया याने या सर्वांना शस्त्र पुरविले. तसेच गोळीबार कसा करायचा, दरोडा कसा घालायचा, 'टार्गेट' पर्यंत कसे पोहोचायचे हे सर्व प्रशिक्षण दिल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. हे दोघे सुरतमधील पिठमपूर जंगलात लपल्याची माहिती दहिसर पोलिसांना मिळाली. त्यानुसार परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त डॉ. डी एस स्वामी आणि दहिसरचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय मराठे, सहायक पोलीस निरीक्षक डॉ चंद्रकांत घार्गे, ओम तोतावार, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर, अभिनय पवार आणि पथकाने सापळा रचत दोघांचा गाशा गुंडाळला. पाटीदारच्याच इशाऱ्यावरून लूट करण्याच्या उद्देशाने पांडेंची हत्या करणाऱ्या आयुष पांडे (१९), निखिल चांडाल (२१), उदय बाली (२१) चिराग रावल (२१) आणि अंकित महाडिक (२१) या पाच जणांना यापूर्वी सुरत जवळून अटक करण्यात आली होती. त्यानुसार आता याप्रकरणातीला अटक आरोपींची संख्या ७ झाली असुन त्यांची चौकशी पोलीस करत आहेत. 

टॅग्स :DacoityदरोडाDeathमृत्यूArrestअटकPoliceपोलिसSuratसूरतjewelleryदागिने