डहाणूत समुद्रमार्गे ४ संशयित व्यक्ती घुसल्याने खळबळ; अफवा न पसरवण्याचे पोलिसांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 17:24 IST2018-10-09T17:20:47+5:302018-10-09T17:24:04+5:30
सोमवारी सायंकाळीच्या सुमारास चिखले गावात ४ संशयीत व्यक्ती समुद्र किनाऱ्यावरून गडबडीने रस्ता ओलांडून चिखले गावात जाताना एका मोटार सायकलस्वाराने पाहिले होते.

डहाणूत समुद्रमार्गे ४ संशयित व्यक्ती घुसल्याने खळबळ; अफवा न पसरवण्याचे पोलिसांचे आवाहन
डहाणू - डहाणू तालुक्यातील चिखले गावात समुद्रमार्गे ४ संशयित व्यक्ती आल्याच्या संशयाने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पालघर पोलिसांनी सोमवारी रात्रीपासून शोधकार्याला सुरुवात केली आहे. मात्र, पोलिसांच्या या शोध मोहिमेमुळ सोशल मीडियावर अफवांना पेव फुटलं आहे. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची अफवा न पसरवण्याचं नागरिकांना आवाहन केलं आहे.
सोमवारी सायंकाळीच्या सुमारास चिखले गावात ४ संशयीत व्यक्ती समुद्र किनाऱ्यावरून गडबडीने रस्ता ओलांडून चिखले गावात जाताना एका मोटार सायकलस्वाराने पाहिले होते. त्यावेळी त्या मोटार सायकलस्वाराने तात्काळ याबाबत वणगांव पोलिसांशी संपर्क साधला असता पोलिसांनी घोलवड पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने चिखले गावात शोध कार्याला सुरुवात केली. याप्रकरणी पोलिस तपास करत आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी याबाबत सध्या सोशल मीडियावर अफवा पसरवणारे मेसेज पाटवू नका, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.