मध्य प्रदेशातील दाेन चोर एलसीबीच्या जाळ्यात; मुद्देमाल जप्त

By देवेंद्र पाठक | Updated: July 11, 2023 17:02 IST2023-07-11T17:01:26+5:302023-07-11T17:02:22+5:30

दोघा चोरट्यांकडून सुमारे ५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Daen Chor in Madhya Pradesh in the net of LCB in dhule | मध्य प्रदेशातील दाेन चोर एलसीबीच्या जाळ्यात; मुद्देमाल जप्त

मध्य प्रदेशातील दाेन चोर एलसीबीच्या जाळ्यात; मुद्देमाल जप्त

धुळे : तालुक्यातील बोरीस येथील सतीदेवी मंदिराची दानपेटी फोडणाऱ्या दोन चोरट्यांना मध्यप्रदेशात जावून पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. चोरीची ही घटना ४ जुलै रोजी मध्यरात्री घडली होती. दोघा चोरट्यांकडून सुमारे ५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मुकेश वासकले (वय २०) आणि भुरेलाल साेलंकी (वय १९) (दोन्ही रा. वाक्या, ता. सेंधवा, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली. अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील आणि पथक उपस्थित होते.

 

Web Title: Daen Chor in Madhya Pradesh in the net of LCB in dhule