शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा रक्षकास मारहाण करून ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 14:28 IST

भरवस्तीतील घटना

ठळक मुद्दे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे व्यावसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली असून विविध ठिकाणी ही पथके रवाना झाली आहेत.

सातारा - शहरातील भरवस्तीत असणाऱ्या ज्वेलर्सच्या दुकानावर सहा दरोडेखोरांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण करून दरोडा टाकला. ही घटना सोमवारी रात्री दोनच्या सुमारास घडली असून दरोडेखोरांनी २८ हजारांचे दागिने चोरून नेले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सदाशिव पेठेमध्ये राधाकृष्ण ज्वेलर्स या नावाचे दुकान आहे. सोमवारी रात्री दोनच्या सुमारास धारदार शस्त्र हातात घेऊन दुकानासमोर आले. सुरक्षा रक्षक बाळकृष्ण गोडसे यांना मारहाण करत चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटले. त्यानंतर दुकानातील सुमारे २८ हजार रुपये किंमतीचा सोन्या चांदीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे व्यावसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

या घटनेनंतर सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुकानातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी गतीने सुरू केले आहे. दरोडेखोर शहरातून बाहेर गेले नसावे, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर रात्रभर नाकाबंदी सुरू असल्यामुळे प्रत्येक वाहन पोलिसांकडून तपासून सोडण्यात येत आहे. अशा प्रकारची कोणतीच संशयास्पद गाडी बाहेर गेली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली असून विविध ठिकाणी ही पथके रवाना झाली आहेत.

टॅग्स :DacoityदरोडाPoliceपोलिसSatara areaसातारा परिसरGoldसोनंSilverचांदी