शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

बंदुकीचा धाक दाखवून सोन्याच्या दुकानावर दरोडा ; कोथरूडमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 20:02 IST

संध्याकाळी साडेचारच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे.

ठळक मुद्देकोथरूड येथील आनंदनगर चौकात असलेल्या पेठे ज्वेलर्स या दुकानात दोघेजण दागिने खरेदी करण्याचा बहाण्याने दुकानात शिरले.चोरी करून चोरटे चांदणी चौकाच्या दिशेने गेल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी संगितले.चोरट्यांनी लुटले सव्वा कोटींचे दागिने

पुणे - कोथरुडमधील पौड रोडवरील आनंदनगर येथील पेठे ज्वेलर्स या सराफी दुकानात दोघा चोरट्यांनी भरदिवसा गोळीबार करुन सव्वा कोटी रुपयांचे दागिने चोरुन नेले़ ही घटना रविवारी दुपारी चार वाजता घडली़ दुकानातील सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले असून पोलिसांनी शोध सुरु केला आहे.पौड रोडवर आनंदनगर येथे तळमजल्यावर पेठे ज्वेलर्स हे सोन्याचांदीचे दुकान आहे़ दुपारी दुकानात ३ सेल्समन आणि एक कॅशियर असे चारजण उपस्थित होते़ ग्राहक दुकानात नव्हते.  दुपारी चार वाजून ८ मिनिटांनी दोघे जण दुकानात शिरले. त्यांच्या पैकी पहिल्या चोरट्याने दुकानात शिरताच कमरेला लावलेले पिस्तुल काढून एक गोळी हवेत झाडली़ त्याच्या पाठोपाठ दुसरा चोरटा आत आला होता़ त्याने आपल्या पाठीवरील सॅक काढले़ पहिल्या चोरट्याने दुकानातील कामगारांवर पिस्तुल रोखून धरत त्यांना हातवर करायला सांगितले़ त्यानंतर शोकेसमधील दागिन्यांचे बॉक्स काढून देण्यास सांगितले़ त्याच्या सांगण्याप्रमाणे कामगारांनी शोकेसमधील दागिन्याचे बॉक्सेस काढून काऊंटरवर ठेवण्यास सुरुवात केली़ दुसरा चोरटा हे सर्व दागिने सॅकमध्ये भरत होता़ त्याने बॉक्समधील सर्व दागिने सॅकमध्ये भरुन घेतले. यादरम्यान कामगारांनी प्रतिकार करु नये, म्हणून त्याने आणखी एक गोळी हवेत फायर केली़. काही मिनिटात त्यांनी दुकानातील सर्व मोठे दागिने सॅकमध्ये भरुन ते पळून गेले. दोघेही चोरटे चांदणी चौकाच्या दिशेने पळून गेले.

या प्रकरणी पराग पेठे यांनी कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ साधारण सव्वा कोटी रुपयांचे दागिने त्यांनी चोरुन नेल्याचा अंदाज आहे. या घटनेची माहिती मिळताच कोथरुड पोलीस तसेच गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन गुन्हेगारांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहे.

टॅग्स :DacoityदरोडाPuneपुणेArrestअटकkothrudकोथरूडPoliceपोलिस