शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

डी कंपनीचा दानिश मुंबई पोलिसांच्या जाळ्यात; अमेरितून प्रत्यार्पण करण्यात यश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 13:04 IST

दानिश सध्या गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत असून त्यांच्या जिवाला धोका असल्याने या अटकेबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.

ठळक मुद्देअमेरिकेने नार्को टेररीझमप्रकरणी दाऊदचा पुतण्या सोहेल कासकर, दानिश याच्यासह दोन पाकिस्तानी नागरिकांना 2014 मध्ये अटक केली होती.  हमीद ख्रिस्ती उर्फ बेनी आणि वाहब ख्रिस्ती उर्फ एंजल या दोघांचा ताबा मिळवण्यासाठी पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी प्रयत्न सुरू केले होते. 15 नोव्हेंबर 2018 रोजी दानिशचा ताबा भारतीय सुरक्षा यंत्रणेला मिळाला.

मुंबई - कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा शस्त्र तस्कर दानिश अलीलीचा ताबा मिळवण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. दानिश सध्या गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत असून त्यांच्या जिवाला धोका असल्याने या अटकेबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. अमेरिकेने नार्को टेररीझमप्रकरणी दाऊदचा पुतण्या सोहेल कासकर, दानिश याच्यासह दोन पाकिस्तानी नागरिकांना 2014 मध्ये अटक केली होती. 

अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेकडे यांना पकडण्यासाठी ठोस पुरावा नसल्यामुळे या दोघांना पकण्यासाठी अमेरिकेने व्यूहरचना आखली. अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांनी त्याचे एक पथक कोलंबिया सरकारच्या विरोधात असल्याचे भासवून या दोघांशी संपर्क साधला. त्यानंतर शस्त्र खरेदी आणि देवाण घेवाणाची बोलणी केली. कुठला साठा हवा आहे. यापासून ते त्यांच्या रक्कमेपर्यंत सर्व गोष्टी अमेरिकेची सुरक्षा यंत्रणा या दोघांच्या नकळत त्यांच्या व्हिडिओ आणि ओडिओ रेकॉंर्डिंगवर घेत होते. या दोघांकडून पुरेशी माहिती आणि पुरावे प्राप्त झाल्यानंतर अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेने सोहेल आणि दानिशसह हमीद ख्रिस्ती उर्फ बेनी आणि वाहब ख्रिस्ती उर्फ एंजल यांना स्पेनमधून 2014 साली अटक केली. त्यानंतर चौघेही दीड वर्ष तुरुंगामध्ये होते. चौघांनी ही गुन्ह्यांची कबूली दिल्यानंतर त्यांचा ताबा एबीआयला देण्यात आला.12 सप्टेंबर 2015 गुन्ह्यांची कबूली दिल्यामुळे न्यायालयाने दोघांना अडीज वर्षांची जाडा पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, हमीद ख्रिस्ती उर्फ बेनी आणि वाहब ख्रिस्ती उर्फ एंजल या दोघांचा ताबा मिळवण्यासाठी पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी प्रयत्न सुरू केले होते. दरम्यान या दोघांचा ताबा मिळवण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणेने देखील प्रयत्न सुरू केल्यानंतर ऑक्‍टोबर 2018 मध्ये अमेरिकन सुरक्षा यंत्रणेने दानिशचा ताबा भारताला देण्याची परवानगी दिली. त्यानुसार 15 नोव्हेंबर 2018 रोजी दानिशचा ताबा भारतीय सुरक्षा यंत्रणेला मिळाला. सोहेलच्या बाबतीत देखील दोन्ही देशांमध्ये परस्पर सामंज्यस्य करार झालेला आहे. त्यामुळे लवकरच सोहेलचा ताबा भारताला मिळू शकतो. सोहेलविरोधात भारतात एकही गुन्हा दाखल नाही. मात्र, त्याच्या मदतीने तपास यंत्रणांना डी कंपनी व त्यांच्या कारवायांविषयी अधिक माहिती मिळू शकते अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. 

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमPoliceपोलिसAmericaअमेरिकाArrestअटक