Cylinder blast at breakfast house in ulhasnagar; One death and one injured | नाश्ता हाऊसमध्ये सिलेंडरचा स्फोट; एकाचा मृत्यू तर एकजण जखमी 
नाश्ता हाऊसमध्ये सिलेंडरचा स्फोट; एकाचा मृत्यू तर एकजण जखमी 

ठळक मुद्देअचानक सिलेंडरचा स्फोट होऊन एका कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. मृत व जखमी कामगारांचे नाव अद्याप कळू शकलेले नाही.

उल्हासनगर - कॅम्प क्रमांक - ३ परिसरातील सी ब्लॉक येथील सदगुरु हॉटेलात दुपारी 3  वाजण्याच्या दरम्यान अचानक सिलेंडरचा स्फोट होऊन एका कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी झालेल्या कामगारावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असून मृत्यूशी झुंज देत आहे. सिलेंडर स्फोटाच्या आगीत संपूर्ण हॉटेल जाळून खाक झाले असून लाखोंचे नुकसान झाले आहे. सुदैवाने दुपारच्या वेळी हॉटेलात वर्दळ नसल्याने जीवितहानी टळली आहे. महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन काही तासात आग आटोक्यात आणली. तर मृत व जखमी कामगारांचे नाव अद्याप कळू शकलेले नाही. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Cylinder blast at breakfast house in ulhasnagar; One death and one injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.