Cyclone Tauktae: रायगडमध्ये खळबळ; समुद्र किनारी पाच मृतदेह सापडले, ONGC च्या बार्जवरील कामगार असण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 19:45 IST2021-05-22T19:44:31+5:302021-05-22T19:45:55+5:30
ONGC Barge 305 sink off in Cyclone Tauktae: जिल्हा पाेलिस अधिक्षक अशाेक दुधे यांची माहिती. ताैक्ते वादळाच्या तडाखा बाॅम्बे हाय परिसरात तेल विहीरींसाठी काम करणाऱ्या नाैका आणि तराफांना बसला हाेता.

Cyclone Tauktae: रायगडमध्ये खळबळ; समुद्र किनारी पाच मृतदेह सापडले, ONGC च्या बार्जवरील कामगार असण्याची शक्यता
लाेकमत न्यूज नेटवर्क
रायगड ः ताैक्ते वादळाच्या तडाखा बाॅम्बे हाय परिसरात तेल विहीरींसाठी काम करणाऱ्या नाैका आणि तराफांना बसला हाेता. खवळलेल्या समुद्रामध्ये कर्मचारी, खलाशी बेपत्ता झाले हाेते. बेपत्ता झालेल्यांपैकी पाच जणांचे मृत देह रायगड जिल्ह्यातील विविध समुद्र किनारी आढळले आहेत. पाच पैकी एक मृतदेह शुक्रवारी सायंकाळी मुरुड समुद्र किनारी आढळला हाेता. यलाे गेट पाेलिस आणि आेएऩजीसीच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली आहे, असे रायगडचे पाेलिस अधिक्षक अशाेक दुधे यांनी लाेकमतशी बाेलताना सांगितले.
अलिबाग तालुक्यातील मांडवा परिसरात दाेन, अलिबाग समु्द किनारी दाेन आणि आणि मुरुड समुद्र किनारी एक असे एकूण आतापर्यंत पाच मृतदेह सापडले आहेत. अचानक समुद्र किनारी मृतदेह दिसून आल्याने स्थानिकांनी याबाबतची माहिती पाेलिसांना दिली. पाेलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्यातील काही मृत देह ताब्यात घेतले आहेत. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे, तसेच मृतदेहाचे डीएनअेचे नमुने घेण्यात येणार आहेत. त्यानंतर मुंबई पाेलिस आणि आेएनजीसी अधिकाऱ्यांना हे मृतदेह देण्यात येणार आहेत, असेही दुधे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ताैक्ते चक्रीवादळामध्ये पी-305 बार्जवरील सुमारे 15 तर वरप्रादा या बार्जवरील 11 खलाशी सहा दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत. रायगडच्या समुद्र किनारी सापडलेले मृतदेह नक्की काेणाचे आहेत. याबाबत प्रश्न चिन्ह आहे.
पी-३०५ बार्जच्या कॅप्टनवर यल्लो गेट पोलिसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
तौक्ते चक्रीवादळाच्या दरम्यान पी-३०५ या बार्जवरील कामगारांचा जीव धोक्यात घातल्याबद्दल कॅप्टन राकेश बल्लव आणि इतरांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पी-३०५ बार्जच्या अभियंत्याने दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा यल्लो गेट पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. यल्लो गेट पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता ३०४(२),३३८,३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.