शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

सायबर सुरक्षेसाठी वर्षात ४ कोटींचा खर्च : कॉसमॉस बँक सायबर दरोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 12:14 IST

कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरसारख्या पॉक्सी सर्व्हरद्वारे एटीएम स्वीचवर हॅकरनी ११ व १३ ऑगस्ट रोजी हल्ला करुन ९४ कोटी ४२ लाख रुपयांवर डल्ला मारला होता़. 

ठळक मुद्देवर्षभरानंतरही मुख्य सुत्रधाराचा नाही तपास

पुणे : कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरसारख्या पॉक्सी सर्व्हरद्वारे उभारुन त्याद्वारे जगभरातील २९ देशातून तसेच भारतातील विविध शहरांमधून क्लोन केलेल्या व्हिसा व रुपे कार्डद्वारे ९४ कोटी ४२ लाख रुपये काढून दरोडा घालण्यात आला होता़. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले़. या वर्षभरात सायबर सुरक्षा विषयक विविध ५ एजन्सीजनी दिलेल्या सूचनेंनुसार ४ कोटी रुपये खर्च करुन बँकेने अद्ययावत सुरक्षा यंत्रणा निर्माण केली आहे़. हॅकरने हल्ला केल्यास त्याचा त्वरीत अलर्ट मिळेल, अशी यंत्रणा उभारण्यात आली असल्याचे बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी सांगितले़. कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरसारख्या पॉक्सी सर्व्हरद्वारे एटीएम स्वीचवर हॅकरनी ११ व १३ ऑगस्ट रोजी हल्ला करुन ९४ कोटी ४२ लाख रुपयांवर डल्ला मारला होता़.  हे पैसे ४१ शहरातील ७१ बँकांच्या विविध एटीएममधून काढले गेले होते़. त्यात भारतात रुपे कार्डच्या माध्यमातून अडीच कोटी रुपये काढले गेले़. त्यातील सर्वाधिक ८९ लाख रुपये कोल्हापूर शहरातील विविध एटीएममधून काढले होते़.याप्रकरणी पुणेपोलिसांनी स्वतंत्र सायबर पथक स्थापन करुन कोल्हापूरवर लक्ष केंद्रीत करुन तेथील एटीएममधून पैसे काढणाºयांना सर्वप्रथम अटक करण्यात यश मिळविले़. आतापर्यंत अशा १३ जणांना अटक केली असून त्यांच्यावर न्यायालयात दोषारोप पत्र पाठविण्यात आले आहे़. याबाबत तपास अधिकारी पोलीस जयराम पायगुडे यांनी सांगितले की, याप्रकरणी २९ देशातील पोलिसांना इंटरपोलमार्फत सर्व माहिती देण्यात आली आहे़. केंद्र सरकारमार्फत सर्व देशांमध्ये पत्रव्यवहार व सर्व कागदपत्रे पाठविण्यात आली आहे़. त्यांच्याकडून योग्य प्रतिसादाची अपेक्षा आहे़ जगभरातील वेगवेगळ्या २९ देशातील पोलिसांशी संपर्क साधण्यात आला आहे़.या हँकरांचा छडा लावण्याचा प्रयत्न सुरु आहे़. मात्र, ही सर्व प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची असल्याने त्यामागील मुख्य सुत्रधाराचा अद्याप छडा लागू शकला नाही़. कॉसमॉस बँकेतून १३ ऑगस्टला हॉगकॉगमधील हँगसेंग बँकेमध्ये ए एल़ एम ट्रेडिंग या खात्यावर १३ कोटी ९२ लाख रुपये हस्तांतरीत करण्यात आले होते़. सायबर क्राईम सेलने तातडीने हालचाल करुन ही रक्कम गोठविण्यास बँकेला सांगितली होती़. त्याप्रमाणे ही रक्कम गोठविण्यात आली आहे़.

........

गोठविलेली रक्कम तीन महिन्यात मिळण्याची अपेक्षायाबाबत बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी सांगितले की, हँगसेंग बँकेत गोठविण्यात आलेली रक्कम मिळण्यासाठी बँकेने हॉगकाँगच्या न्यायालयात अपिल करुन ही रक्कम हस्तांतरीत करण्यास स्थगिती मिळविली आहे़. ही रक्कम मिळविण्यासाठी आर्थिक सल्लागाराची नेमणूक केली आहे़ .सध्या हॉगकॉगमधील वातावरण अस्थिर असल्याने त्याचा परिणाम पोलिसांकडून मिळणाºया प्रतिसादावर झाला आहे़. तरीही येत्या ३ महिन्यात ही रक्कम बँकेला परत मिळू शकेल, असे वाटत आहे़.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकbankबँक