सायबर गुन्हेगारांच्या गळाला लागून नफ्याच्या आमिषाने पनवेलमधील वृद्धाला ५२ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 12:52 IST2025-01-06T12:48:34+5:302025-01-06T12:52:15+5:30
सदर व्यक्तीने त्यांना व्हाॅट्सॲप ग्रुपमध्ये घेऊन त्या ठिकाणी इतरांना होणारा आभासी नफा दाखवला

सायबर गुन्हेगारांच्या गळाला लागून नफ्याच्या आमिषाने पनवेलमधील वृद्धाला ५२ लाखांचा गंडा
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल, नवी मुंबई : शेअर ट्रेडिंगचा अनुभव असतानाही सायबर गुन्हेगारांच्या गळाला लागून वृद्धाने ५२ लाख रुपये गमावल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पनवेल परिसरात राहणाऱ्या ६२ वर्षीय व्यक्तीसोबत हा प्रकार घडला आहे.
सप्टेंबर २०२४ मध्ये त्यांना पहिल्यांदा अज्ञात व्यक्तीने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले असता त्यांनी नकार दिला होता. मात्र त्यानंतरही सदर व्यक्तीने त्यांना व्हाॅट्सॲप ग्रुपमध्ये घेऊन त्या ठिकाणी इतरांना होणारा आभासी नफा दाखवला. त्यामुळे पुढील काही दिवसांत टप्प्याटप्प्याने त्यांनी ५२ लाख ७५ हजार रुपये भरले. त्यापैकी ७५ हजार रुपये त्यांना अधूनमधून गळाला लावण्यासाठी नफ्याच्या स्वरूपात परत दिले. त्यांनी गुंतवणूक थांबवली असता टॅक्स किंवा इतर कारणांनी अधिक पैशाची मागणी होऊ लागली आणि त्यांची फसवणूक झाली.