हौशी तरूणांना जिगोलो बनवण्यासाठी कॉल करत होत्या तरूणी, रॅकेटचा भांडाफोड..
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 11:46 IST2022-06-11T11:46:05+5:302022-06-11T11:46:25+5:30
Delhi Crime News : 8 तरूणी कॉल सेंटरमध्ये काम करत होत्या. पोलिसांनी आता कॉल सेंटरच्या मास्टर माइंडला अटक केली आहे. 8 तरूणींना पुढील चौकशीसाठी नोटीस जारी करण्यात आली आहे.

हौशी तरूणांना जिगोलो बनवण्यासाठी कॉल करत होत्या तरूणी, रॅकेटचा भांडाफोड..
Delhi Crime News : सायबर क्राइम पोलीस स्टेशन बाहरी उत्तर जिल्हा बवानाने 'इंडियन जिगोलो' नावाने सुरू असलेल्या एका फेक कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. फेक कॉल सेंटरच्या मालकाने जिगोलोच्या नावाव लाखो रूपये लाटण्याची प्लान केला आणि 50 पेक्षा जास्त लोकांना जिगोलोच्या नावावर फसवलं. 8 तरूणी कॉल सेंटरमध्ये काम करत होत्या. पोलिसांनी आता कॉल सेंटरच्या मास्टर माइंडला अटक केली आहे. 8 तरूणींना पुढील चौकशीसाठी नोटीस जारी करण्यात आली आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून 12 कीपॅड फोन, एक अॅन्ड्रॉइड फोन आणि 16 नोटबुक ताब्यात घेतले आहेत. चौकशी दरम्यान असं आढळून आलं की, आरोपी पैसे मिळवण्यासाठी पेटीएमचा वापर करत होते. अकाउंट ट्रॅक करण्यात आलं आणि त्यानंतर एका ठिकाणी छापा मारण्यात आला. जिथे एक फेक कॉल सेंटर आणि लैंगिक शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या आणि स्प्रे विकण्याचं काम चालत होतं. तसेच इथेच लोकांना जिगोलो सेवा देण्यासाठी प्रेरित केलं जात होतं.
आरोपी मेहताबने 8 महिलांना कॉल करण्यासाठी काम दिलं आणि जस्ट डायल व अश्लील वेबसाइट्वर जाहिराती दिल्या. महिला कॉल करून पुरूषांना लैंगिक शक्ती वाढवणाऱ्या औषधांची माहिती देत होत्या. जर कुणी पुरूष सांगत होता की, त्याला औषधांची गरज नाही, त्यात शक्ती भरपूर आहे तेव्हा तरूणी त्याला लगेच जिगोलो बनण्याची ऑफर देत होत्या. त्यावरून त्यांची फसवणूक केली जायची.
या फेक कॉल सेंटरमध्ये रोज 50 ते 100 कॉल येत होते. तरूणी साधारण रोज 500 नंबर्सवर कॉल करत होत्या. त्यातील 10-20 लोकांना जिगोलो बनण्यासाठी तयार करत होते. त्यांच्याकडून पैसे घेऊन नंबर ब्लॉक करत होत्या.