शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 12:41 IST

Raja Raghuvanshi And Sonam Raghuvanshi : सोनम आणि राजची धूर्तता पाहून पोलीसही हैराण झाले आहेत. दोघांनीही राजा रघुवंशीला मारण्यापासून ते स्वतःला वाचवण्यापर्यंत सर्व काही खतरनाक पद्धतीने प्लॅन केलं होतं.

सोनम आणि राजची धूर्तता पाहून पोलीसही हैराण झाले आहेत. दोघांनीही राजा रघुवंशीला मारण्यापासून ते स्वतःला वाचवण्यापर्यंत सर्व काही खतरनाक पद्धतीने प्लॅन केलं होतं. शिलाँगमधून बुरखा घालून पळून जाण्याचा प्लॅन असो किंवा दुसऱ्या मुलीला मारून ती सोनम असल्याचं सिद्ध करण्याचा कट असो, प्रत्येक पावलावर दोघांनी नवीन शक्कल लढवली होती. सोनमने ज्या संजय वर्माला कॉल केले होते तो दुसरा तिसरा कोणी नसून राज कुशवाहचं असल्याचं समोर आलं आहे. 

सोनम आणि राजाच्या साखरपुड्याचे आणि लग्नाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये सोनम हसताना दिसत आहे. शिलाँग पोलिसांनी केलेल्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे झाले. सोनम तिच्या लग्नाच्या तीन महिने आधी संजय वर्मा नावाच्या व्यक्तीशी तासन्तास फोनवर बोलत असे. १ मार्च ते २५ मार्च दरम्यान सोनम संजयशी ११२ पेक्षा जास्त वेळा बोलली होती. पण जेव्हा पोलिसांनी तो नंबर ट्रॅक केला तेव्हा त्यांना धक्का बसला. कारण फोन वापरणारा व्यक्ती संजय नव्हता तर सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह होता. आता पोलीस हा नंबर कोणाच्या आधार कार्डवरून घेतला होता याचा तपास करत आहेत. 

"आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

शिलाँगचे पोलीस अधीक्षक विवेक सीएम यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजाची हत्या अचानक झाली नव्हती. ती अंमलात आणण्याचे किमान तीन अयशस्वी प्रयत्न झाले. प्रथम गुवाहाटी, नंतर नोंगरियाट आणि नंतर वेसाडोंग फॉल्सजवळ हत्येचा प्लॅन करण्यात आला होता. अखेर २३ मे रोजी मेघालयातील सोहरा येथे राजचे मित्र विशाल, आकाश आणि आनंद यांनी राजची हत्या केली. 

चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती

बनावट मृतदेह दाखवून पळण्याचं प्लॅनिंग

मेघालयातील राजा रघुवंशी हत्याकांडाच्या तपासात सोनम रघुवंशीने दुसऱ्या महिलेला मारण्याचा आणि तिचा मृतदेह स्वतःचा असल्याचं भासवण्याचा देखील प्लॅन केला होता पण ती यशस्वी झाली नाही. राजाच्या हत्येनंतर सोनमने बुरखा घातला आणि शिलाँगहून फरार झाली. ती शिलाँगहून आसामला, तेथून पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमधून गेली आणि शेवटी इंदूरला परतली. येथे राजने एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. ती येथे अनेक दिवस राहिली.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस