शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

अमानुषपणा! रिक्षाचालकाचे केस पकडून फरफटत आणलं, लोखंडी प्लेटवर डोकं आपटून मारहाण

By पूनम अपराज | Updated: October 13, 2020 17:51 IST

Brutally Assaulting : ही घटना रविवारी दुपारी 4.15 च्या सुमारास आधारल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

ठळक मुद्देऑटो रिक्षाचालकाला बेशुद्ध होईपर्यंत निर्घृणपणे मारहाण करण्यात आली. बेशुद्ध अवस्थेतत त्याला लोखंडी प्लेटनं मारहाण करण्यात आली.

नवी दिल्ली - किरकोळ रस्त्यात झालेल्या अपघातानंतर रिक्षा चालकाला हिंसक पद्धतीने मारहाण करण्यात आली असून या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा उभा राहतो. या मारहाणीचा भीषण व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एवढेच नाही तर रिक्षाचालकाला वाचवण्यासाठी गेलेल्या लोकांनाही आरोपीने शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. सोमवारी या घटनेसंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याप्रकरणी पोलिसांनी चंदन सिंग आणि अभिषेक दुबे या दोन आरोपींना अटक केली आहे. मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये ही भीषण घटना घडली. ऑटो-रिक्षाने स्कूटरला धडक दिल्याने हा अमानुष मारहाणीचा प्रकार घडला. ही घटना रविवारी दुपारी 4.15 च्या सुमारास आधारल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.ऑटो रिक्षाचालकाला बेशुद्ध होईपर्यंत निर्घृणपणे मारहाण करण्यात आली. बेशुद्ध अवस्थेतत त्याला लोखंडी प्लेटनं मारहाण करण्यात आली. चालकाला उचलून उचलून फेकण्यात देखील आलं. यानंतर हल्लेखोरांनी चालकाला खेचत पोलीस स्टेशनपर्यंत घेऊन गेले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. सोमवारी हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बहुगुणा यांनी हल्लेखोरांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. सध्या रिक्षाचालक अजित विश्वकर्मा याची प्रकृती गंभीर आहे.आधारल पोलिसांनी सांगितले की, ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.१५ वाजता एक युवती आपल्या लहान बहिणीसह मोपेडवर बसून कुठेतरी जात होती. दुसऱ्या बाजूनं लोडिंग ऑटोने (एमपी -20 एलबी 2370) मोपेडला धडक दिली. तेव्हा, दोघी बहिणी खाली पडल्या, त्यांना किरकोळ दुखापत झाली. मात्र, त्यानंतर दोन तरुणांनी ऑटो चालकाला अमानुषपणे मारहाण करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोलिसांनी चंदन सिंग आणि अभिषेक दुबे यांना अटक केली आहे. 

टॅग्स :ArrestअटकMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसauto rickshawऑटो रिक्षाAccidentअपघात