शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

वाहनाने चिरडले; महिला पोलिसाच्या पतीचा मृत्यू, सैन्य दलातून झाले होते निवृत्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 19:27 IST

Accident Case : दत्तपूर वळण रस्त्यावरील अपघात

वर्धा : दुचाकीने जात असताना मागाहून भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकी चालकाला चिरडल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास दत्तपूर पासून गेलेल्या नागपूर ते नागपूर बायपास रस्त्यावर झाला. दीपक गौतम ताकसांडे (३७) रा. पोलीस वसाहत पिपरी मेघे असे मृतकाचे नाव आहे.दीपक ताकसांडे हे २००४ मध्ये सैन्य दलात भरती झाले होते. सहा महिन्यांपूर्वीच ते सैन्य दलातून सेवा निवृत्त झाले. ते एम.एच.३२ ए.बी. ४८९३ क्रमांकाच्या दुचाकीने पिपरी येथील पोलीस वसाहतीत असलेल्या त्यांच्या घरी जात असताना मागाहून भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने ते ट्रकच्या चाकात आल्याने ट्रकने त्यांना काही अंतरावर चिरडत नेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत रस्त्यावर पडून होता. याची माहिती सेवाग्राम पोलिसांना मिळताच पोलिसांनी अपघातस्थळ गाठून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. अपघातस्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप यांनीही भेट दिली होती.मृतक दीपक ताकसाडे यांच्या मागे पत्नी दोन मुलं असा आप्त परिवार आहे. १८ रोजी सोमवारी दुपारच्या सुमरास मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला असून अंत्यसंस्कार पार पडले. पुढील तपास सेवाग्राम पाेलीस करीत असून ट्रकचालकाचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलीस प्रशासनात खळबळ...मृतक दीपक ताकसांडे यांची पत्नी प्रियंका ताकसांडे या पोलीस अधीक्षक कार्यालयात कर्तव्यावर आहेत. पोलीस कंट्राेल रुमला दीपक ताकसांडे यांच्या अपघाती निधनाची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. दीपकच्या अपघाती निधनामुळे पोलीस कर्मचाऱ्यांतही हळहळ होती हे विशेष.

 

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसSoldierसैनिकDeathमृत्यू