Cruise Drug Case : पार्टीदरम्यान कोरोना नियमांचेही उल्लंघन झाल्याने मुंबई पोलिसांकडूनही चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 21:55 IST2021-10-05T21:54:09+5:302021-10-05T21:55:13+5:30
Cruise Drug Case: क्रुझ पार्टीच्या परवानगीबाबतही पथक अधिक तपास करत आहेत.

Cruise Drug Case : पार्टीदरम्यान कोरोना नियमांचेही उल्लंघन झाल्याने मुंबई पोलिसांकडूनही चौकशी
मुंबई : कॉर्डेलिया क्रूझमध्ये आयोजित ड्रग्ज पार्टीवर राष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) केलेल्या कारवाईनंतर आता मुंबईपोलिसांकड़ूनही वेगवेगळ्या अँगलने तपास सुरु असल्याचे समजते आहे. तसेच क्रुझ पार्टीच्या परवानगीबाबतही पथक अधिक तपास करत आहेत.
पार्टीदरम्यान कोरोना नियमांचेही उल्लंघन झाल्याचे दिसून आले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासन आणि प्रशासनाकडून काही निर्बंध आणि अटी घालण्यात आल्या आहेत. पार्टीमध्ये हजारो जण सहभागी होऊन मुंबईत परतणार होते. मुंबई पोलीस कोरोना महामारी संदर्भात कायद्याचे उल्लंघन झाले की नाही याचीही चौकशी करत आहेत. याप्रकरणात जर नियम मोडल्याची बाब समोर आली तर, मुंबई पोलीस कलम १८८ अन्वये गुन्हा नोंदविण्याची शक्यता आहे.
मुंबईहून गोव्याला निघालेल्या कॉर्डेलिया क्रूझवर एनसीबीच्या पथकाने शनिवारी रात्री छापेमारी करुन बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान (२३) याच्यासह आठ जणांना अटक केली आहे. त्यानंतर एनसीबीने आणखी चौघांना अटक केली आहे.