क्रूरता! बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीचे अंतर्वस्त्र तोंडात कोंबून केली हत्या
By पूनम अपराज | Updated: November 30, 2020 21:49 IST2020-11-30T21:48:43+5:302020-11-30T21:49:10+5:30
Rape And Murder : कोतवाली वृंदावनमध्ये वडिलांनी आठ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती दिली होती.

क्रूरता! बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीचे अंतर्वस्त्र तोंडात कोंबून केली हत्या
मथुरा जिल्ह्यात मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी वृंदावन पोलिस आणि एसओजीने उघडकीस आणली आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. बलात्कारानंतर अमली पदार्थांचे व्यसन असलेल्या आरोपीने मुलीच्या तोंडात अंतर्वस्त्र कोंबून ठार मारले. कोतवाली वृंदावनमध्ये वडिलांनी आठ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृंदावन कोतवाली येथील रामनरेती चौकी भागात राहणारी आठ वर्षांची मुलगी, गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास नातेवाईक महिलेसह लाकडं गोळा करण्यासाठी शेजारील जंगलात गेली. ती तिथून बेपत्ता झाली होती. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी मुलीच्या शोधात शोध मोहीम राबविली, पण मुलगी काही सापडली नाही. या प्रकरणात वृंदावन कोतवाली पोलिसांनी मुलगी हरवल्याबाबत तक्रार नोंद केली होती.
शुक्रवारी सकाळी मुलीचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत जंगलात आढळला. वृंदावन कोतवाल अनुज कुमार व एसओजी प्रभारी धीरज गौतम यांनी या बालिकेच्या हत्येचा तपास करत या गुन्ह्यात सहभागी झालेल्या महेश, रहिवासी तारौली सामौली कोतवाली छाता याला अटक केली आहे.
व्यसनाधीन आहे आरोपी
सीओ सदर रमेश तिवारी म्हणाले की, अटक आरोपी हा व्यसनी आहे. आरोपीच्या शरीरावर आणि कपड्यांवर मुलीवर बलात्कार केल्याचे पुरावे सापडले आहेत. आरोपीकडून जप्त केलेल्या रुमालावर रक्ताचे डागही सापडले आहेत. ज्याची फॉरेन्सिक तपासणी केली जाईल आणि पुरावा म्हणून सादर केले जातील. आरोपीने मुलीचे अंतर्वस्त्र तिच्या तोंडात कोंबल्याने तिचा गुदमरून मृत्यू झाला.