शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

निर्दयता ! हिंगोलीतील नांदुसा येथे १२ वर्षीय चिमुकलीचा गळा चिरून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 19:52 IST

हिंगोली जिल्ह्यात हृदय पिळवून टाकणारी घटना

ठळक मुद्देमृत मुलगी जि. प. शाळेत सहाव्या वर्गात शिकायला होती. आई वडील शेतात गेल्याने घरात एकटी होती

हिंगोली / कळमनुरी : तालुक्यातील नांदुसा येथे एका बारा वर्षीय मुलीचा गळा चिरून निर्घृन खून केल्याची घटना २१ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. मयत मुलीचे नाव प्रियंका शिवाजी कांबळे असून गावातील जि. प. शाळेत सहाव्या वर्गात शिकायला होती. 

हिंगोली तालुक्यातील नांदुसा येथील शिवाजी कांबळे  यांना दोन मुली व दोन मुले आहेत. २१ मे रोजी कांबळे कुटंूबिय शेतात काम करण्यासाठी गेले होते. तर घरी प्रियंका कांबळे (१२) आणि आशिष कांबळे (४) हे दोघेजण घरीच होते. परंतु या दरम्यान आशिष हा घराबाहेर खेळत असताना एका अज्ञात आरोपीने घरात प्रवेश करून प्रियंकाचा गळा चिरून खून केला. त्यानंतर मयत प्रियंकाची मोठी बहिण स्नेहा ही घरी आली. यावेळी प्रियंकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहताच तिने हंबरडा फोडला. शेतात जाऊन याबाबत आई वडिलांना माहिती दिली. काही वेळातच शिवाजी कांबळे व त्यांच्या पत्नी घरी आले. प्रियंकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पाहताच यावेळी  आई व वडिलांनी एकच आक्रोश केला. परंतु हा खून कोणी व कोणत्या करणातून केला हे मात्र कळू शकले नाही. मयत प्रियंकाचे प्रेत शवविच्छेदनासाठी हिंगोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात आणले जात होते. याबाबत पोलिसांना मिळताच घटनास्थळी डीवायएसपी  रामेश्वर वैंजणे, सपोनि राजेश मलपिलू आणि पोलीस कर्मचारी दाखल झाले. घटनास्थळी पोलिसांना ब्लेड आढळुन आली आहे. त्यामुळे प्रियंकाचा खून धारदार ब्लेडने केला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. प्रियंकाचा निर्दयीपणे गळा चिरून हत्या केल्याने गावात एकच खळबळ उडाली. 

योग्य दिशेने तपास केला जाईलपोलीस अधीक्षक योगेश कुमार म्हणाले सदर घटनेचा योग्य दिशेने तपास केला जाईल. शवविच्छदनानंतरच अधिक माहिती मिळेल. घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्मचारी पोहचले असून त्यांनी पंचनामा केला आहे. परंतु आरोपीने हे कृत्य कोणत्या कारणातून केले हे मात्र तपासामध्ये उघडकीस येईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोलीMurderखून