Cruel! The young man was hanged by a young man with a rope around his neck; Three arrested | निर्दयी! गळ्यात दोरी टाकून तरुणांनी दिली  माकडाला ‘फाशी’; तिघांना अटक

निर्दयी! गळ्यात दोरी टाकून तरुणांनी दिली  माकडाला ‘फाशी’; तिघांना अटक

हैदराबाद : एका माकडाला फाशी देऊन ठार मारल्याच्या आरोपावरून तेलंगणाच्या खम्माम जिल्ह्यातील अम्मापालेम गावातील तीन तरुणांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी अटक करून नंतर जामिनावर सोडले. वन्यजीव कायदा व प्राण्यांच्या छळास प्रतिबंध करणाºया कायद्याखाली ही कारवाई करण्यात आली.

त्या गावात माकडांच्या टोळ्यांनी गेले काही दिवस उच्छाद मांडला होता. आरोपींच्या शेतात माकडांची अशीच एक टोळी येऊन नुकसान करू लागल्यावर काही मुले हातात काठ्या घेऊन माकडांना हाकलू लागली. उड्या मारून झाडांवरून पळताना एक माकड खाली पडून बेशुद्ध पडले. काही तरुणांनी त्या माकडाला गळ्याला दोरी बांधून झाडाच्या फांदीला लटकविले. थोड्या वेळाने माकड शुद्धीवर आले व गळ्याला फास लागल्याने तडफडू लागले. थोड्या वेळाने ते मरण पावले. या सर्व घटनेचा व्हिडिओ व्हॉट््सअ‍ॅपवर जिल्हाभर व्हायरल झाला. तो पाहूनच वन विभागाने कारवाई केली.

Web Title: Cruel! The young man was hanged by a young man with a rope around his neck; Three arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.