शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

क्रूर आईने सेक्ससाठी विकले ५ वर्षाच्या मुलीला; नंतर चिरमुरडीचा मिळाला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 18:35 IST

Crime News : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिस्टी सिपलने तिची मुलगी  कैमेरी हॉलंड हिला काही रुपयांसाठी एका व्यक्तीला विकले.

जॉर्जियामध्ये एका आईने आपल्या पाच वर्षांच्या मुलीला सेक्ससाठी विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर महिलेकडून मुलगी विकत घेणाऱ्या व्यक्तीनेच मुलीची हत्या केली. 'डेली मेल'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार पोलिसांनी मंगळवारी 35 वर्षीय क्रिस्टी सिपलला अटक केली. तिच्याविरोधात मानवी तस्करी आणि खुनाचे आरोप ठेवण्यात आले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिस्टी सिपलने तिची मुलगी  कैमेरी हॉलंड हिला काही रुपयांसाठी एका व्यक्तीला विकले. पोलिसांनी पुढे सांगितले की, त्यांना  कैमेरीचा मृतदेह अलबामाच्या फिनिक्स शहरात असलेल्या एका निर्जन घरात पडलेला आढळला. ती मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार काही काळापूर्वी दाखल झाली होती.अटक होण्याआधी, क्रिस्टीने WTVM-TV ला सांगितले की, तिच्या मुलीच्या बेपत्ता आणि हत्येत तिचा कोणताही सहभाग नाही. ती म्हणाली, मी आई आहे. मी असे काहीही केलेले नाही. ती माझं आयुष्य होती आणि मी तिच्यासाठी जगत होतो. मलाही तीन मुलगे आहेत. पण माझं माझ्या मुलीवर खूप प्रेम होतं.क्रिस्टीने सांगितले की, तिचे पती कोरी हॉलंड यांच्याकडे कैमेरीचा ताबा होता आणि जेव्हा ती तिच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचली, तेव्हा तिच्या पतीने तिला तेथून हाकलून दिले. क्रिस्टीने मीडियावर तिची प्रतिमा खराब केल्याचा आरोपही केला आहे. क्रिस्टी म्हणाली, मी निर्दोष आहे. मी काहीही चुकीचे केलेले नाही. मीडियानेही माझी इतकी बदनामी केली आहे की लोक मला दुष्ट स्त्री समजू लागले आहेत.तर, पोलिसांचे म्हणणे आहे की, क्रिस्टीने आपली मुलगी जाणूनबुजून एका पुरुषाला विकली. आरोपी क्रिस्टीशिवाय पोलिसांनी 37 वर्षीय जेरेमी ट्रेमेन विल्यम्सलाही अटक केली आहे. त्याने   कैमेरीचा गळा दाबून खून केला होता. शवविच्छेदन अहवालात हेही उघड झाले आहे की, हत्येपूर्वी  कैमेरीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते.

त्याचवेळी  कैमेरीच्या वडिलांनीही या सगळ्यासाठी क्रिस्टीला जबाबदार धरले. ते म्हणाले, "क्रिस्टीने हे करून आपल्याला सर्वात जास्त दुखावले आहे आणि आयुष्यभर वेदना दिल्या आहेत. मात्र, पोलिसांनी तिला अटक केल्याचा मला आनंद आहे. आता आपण न्यायापासून फक्त एक पाऊल दूर आहोत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूMissingबेपत्ता होणंsexual harassmentलैंगिक छळArrestअटकPoliceपोलिस