शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
2
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
3
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
4
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
5
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
6
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
7
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
8
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
9
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
10
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
11
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
12
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
13
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
14
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
15
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
16
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
17
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
18
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
19
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
20
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

क्रूर आई! पहिले सख्खा नंतर सावत्र मुलाला आईने संपवले; गोणीत भरून फेकून दिला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 21:08 IST

Murderous moms in Ahmedabad:पोलिसांनी या महिलेने १५ वर्षांपूर्वी आपल्या ११ वर्षीय मुलाची देखील हत्या केली असल्याचे सांगितले. गौरीने ७ वर्षांपूर्वी हार्दिकचे वडील राजनीकांतशी लग्न केले. 

ठळक मुद्देमुलाची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह एका गोणीत भरून अहमदाबमधील दस्करोई तालुक्यातील कुंजड गावात फेकून दिला. गौरी पटेल असं या आरोपी महिलेचं नाव आहे.

अहमदाबाद - ४८ वर्षीय एका महिलेने आपल्या २१ वर्षीय सावत्र मुलगा हार्दिक पटेल याची गळा आवळून हत्या केली. मुलाची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह एका गोणीत भरून अहमदाबमधील दस्करोई तालुक्यातील कुंजड गावात फेकून दिला. गौरी पटेल असं या आरोपी महिलेचं नाव आहे. पोलिसांनी या महिलेने १५ वर्षांपूर्वी आपल्या ११ वर्षीय मुलाची देखील हत्या केली असल्याचे सांगितले. गौरीने ७ वर्षांपूर्वी हार्दिकचे वडील राजनीकांतशी लग्न केले. 

हार्दिकचा लहान भाऊ उमंग पटेल कांभा भागात दुधाची डेअरी चालवतो. त्याने पोलिसांना जबाबात सांगितलं की, सावत्र आई गौरी आणि भाऊ हार्दिक नेहमी पैशांवरुन भांडण करीत होते. माझी सावत्र आई आमच्या डेअरी व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या नावाखाली नातेवाईक आणि वडिलांच्या मित्रांकडून पैसे उधार घेत होती. मात्र, हे पैसे तिने कधीच डेअरीसाठी खर्च केले नाही. उमंगने आरोप केला आहे की, गौरीने अशा प्रकारे पैसे जमवून नातेवाईकांकडून २५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. हार्दिकला कोरोना, लॉकडाऊन आणि कर्फ्यूमुळे डेअरी व्यवसायाचे खूप नुकसान झाले होते. जेव्हा या नातेवाईकांनी पैसे परत मागितले तेव्हा नेमका प्रकार समोर आला. 

मंगळवारी सकाळी हार्दिक घरात एकटा झोपलेला होता आणि उमंग डेअरीवर होता. गौरीने नाशिकमधील आपले तीन नातेवाईक संजय, अनिल, दिनेश यांच्यासह मिळून हार्दिकचा गळा आवळला. यानंतर त्यांनी त्याचा मृतदेह एका गोणीत भरून फेकून दिला, अशी माहिती येथील पोलिसांनी दिली आहे. उमंग जेव्हा घरी परतला तेव्हा रात्री उशिरा हार्दिक घरी परतना नाही म्हणून त्याने गौरीकडे याबाबत विचारणा केली. मात्र तिने उत्तर दिलं नाही. यावेळी त्याने शेजारच्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की, गौरीचे तीन नातेवाईक एका गोणीत काही तरी भरून घेऊन जात होते. दरम्यान पोलिसांना कांभा येथील झुडपांमध्ये एक मृतदेह सापडला आणि हा हार्दिकच होता. या प्रकरणात गौरीची चौकशी केल्यानंतर तिने गुन्हा कबुल करत आपल्या तीन नातेवाईकांची नावं सांगितली.

पोलिसांच्या चौकशीत गौरीने आणखी एक धक्कादायक माहिती दिली. जेव्हा ती २०१४ साली नाशिकमध्ये काम करीत होती, तेव्हा तिने आपल्या ११ वर्षांच्या मुलाचीही हत्या केली होती. यावेळी पोलिसांना खोटं कारणं सांगून ती कशीबशी यातून सुटली होती. त्यानंतर २०१५ साली तिने दुसरं लग्न हार्दिकचे वडील रजनीकांत यांच्याशी केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGujaratगुजरातPoliceपोलिसDeathमृत्यू