शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कथित बलात्काराच्या प्रकरणातून सीआरपीएफचे अधिकारी खजानसिंह टोकस निर्दोष मुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 15:24 IST

Khajan Singh Tokas acquitted : कुस्ती संघातून बाहेर काढल्याचा रागात महिलेने केलेले आरोप

ठळक मुद्देआंघोळ करतानाचे नग्न फोटो काढून ते फोटो इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोपही तीने केला होता. मात्र, दंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवताना महिलेने आरोप मागे घेतले. 

नवी दिल्ली - केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) मुख्य क्रीडा अधिकारी अर्जून पुरस्काराने सन्मानित जलतरणपटू खजानसिंग यांची महिला कॉन्स्टेबलने केलेल्या कथित बलात्काराच्या प्रकरणातून दिल्लीच्या न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. खजानसिंह टोकस हे काँग्रेस नेत्या चारूलता टोकस यांचे पती आहेत.

महिला कॉन्स्टेबलने आरोप केला होता की, खजानसिंग आणि सीआरपीएफचे कुस्ती प्रशिक्षक, निरीक्षक सरजित सिंह यांनी तिच्याकडे लैंगिक सुखाची मागणी करुन अनेकप्रसंगी बलात्कार केला. या दोघांवर सेक्स स्कँडल चालवल्याचा आरोपही तीने केला होता तसेच बलात्कार, लैंगिक छळ आणि धमकीचे आरोपही केले होते. आंघोळ करतानाचे नग्न फोटो काढून ते फोटो इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोपही तीने केला होता. मात्र, दंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवताना महिलेने आरोप मागे घेतले. 

खजानसिंह व त्यांच्या सहकाऱ्याला निर्दोष मुक्त करताना न्यायालयाने म्हटले आहे की, अभियोक्ताच्या साक्षीतून हे स्पष्ट होते की आरोपी व्यक्तींनी कोणत्याही वेळी बलात्कार केला नाही किंवा धमकी दिली नाही. जबाबात तक्रारदाराने कबूल केले की तिने आरोपी व्यक्तीविरोधात रागाच्या भरात तक्रार केली होती. आरोपींविरोधात काहीही दोषी आढळले नाही. तिला अनुशासनाच्या कारणावरून कुस्ती संघातून बाहेर काढले होते. याचा राग धरून तिने तक्रार केली. तक्रार दाखल करण्यासाठी या महिलेला तिच्या काही सहकाऱ्यांनी भडकावले होते, असे न्यायालयाने नमूद केले आहे.

ही महिला कॉन्स्टेबल २०१० साली सीआरपीएफमध्ये सामील झाली होती आणि सीआरपीएफच्या कुस्ती पथकाचा भाग असताना अनेक पदके जिंकली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या महिलेने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये दोघांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. खजानसिंह टोकस एक आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आहेत. १९८६ मध्ये आशियाई स्पर्धेत खजानसिंह यांनी कास्य पदक पटकावले होते. महिला सहकाऱ्याने केलेल्या बलात्काराच्या खोट्या आरोपाने त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रकार झाला परंतु न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Courtन्यायालयSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसSwimmingपोहणे