कमी किंमतीत फ्लॅट, दुकान देण्याचे आमिष दाखवून घातला कोटींचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 20:47 IST2019-12-02T20:34:16+5:302019-12-02T20:47:15+5:30
तिघांविरोधात गुन्हा दाखल

कमी किंमतीत फ्लॅट, दुकान देण्याचे आमिष दाखवून घातला कोटींचा गंडा
ठळक मुद्देमे २०१४ ते डिसेंबर २०१५ या कालावधीत तिघांनी त्यांच्याकडून ही रक्कम घेतली असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.कमी किंमतीत फ्लॅट,दुकान आणि गाडी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाला १ कोटी ८३ लाखाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
मुंबई - कमी किंमतीत फ्लॅट,दुकान आणि गाडी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाला १ कोटी ८३ लाखाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. ही घटना दहिसर येथे घडली आहे. याप्रकरणी एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांविरुद्ध हा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार नरेश हिरानी यांनी ही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. मे २०१४ ते डिसेंबर २०१५ या कालावधीत तिघांनी त्यांच्याकडून ही रक्कम घेतली असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.