Crimes against both in controversial post Wani against CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्र्यांविरुद्ध वादग्रस्त पोस्ट; वणीत दोघांविरुद्ध गुन्हे

मुख्यमंत्र्यांविरुद्ध वादग्रस्त पोस्ट; वणीत दोघांविरुद्ध गुन्हे

वणी (यवतमाळ) : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावषियी सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांनी केली आहे.

सतीश नीळकंठ पिंपळे (५५) रा.नांदेपेरा रोड वणी व विवेक पांडे, रा.वणी अशी आरोपींची नावे आहेत. सतीश पिंपळे याने साधुंच्या हत्येप्रकरणी या नेत्याविषयी अतिशय शिवराळ भाषेत पोस्ट एका व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर टाकली. तसेच विवेक पांडे याने फेसबुक अकाऊंटवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह फोटो टाकला.

Web Title: Crimes against both in controversial post Wani against CM Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.