शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मनीष आनंदसह ८ जणांवर विनयभंगासह खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा; हर्षवर्धन जाधव मारहाण प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 14:59 IST

न्यायालयाच्या आदेशानुसार हर्षवर्धन जाधव व त्यांच्या महिला सहकार्यांचे अपहरण करुन त्यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते मनीष आनंद यांच्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पुणे : गाडी दरवाजा अचानक उघडल्याने दुचाकीवरुन जाणारे ज्येष्ठ दाम्पत्य त्याला धडकून जखमी झाले होते. याप्रकरणी ज्येष्ठ दाम्पत्याला मारहाण केल्याबद्दल कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली होती. याप्रकरणी आता न्यायालयाच्या आदेशानुसार हर्षवर्धन जाधव व त्यांच्या महिला सहकार्यांचे अपहरण करुन त्यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते मनीष आनंद यांच्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

अमन चड्डा, करण चड्डा, ममता चड्डा, अजय चड्डा, मनिष आनंद (रा. खडकी बाजार) आणि दोन अनोळखी व लोकांच्या गर्दीतील एक जण अशा ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना औंध येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेसमोर तसेच औंधमधील एका चौकात १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ ते रात्री साडेआठ दरम्यान घडला. याप्रकरणात हर्षवर्धन जाधव यांनी ज्येष्ठ दाम्पत्याला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर त्यांनी पुढील चौकात आणखी एका वाहन चालकाला धडक दिल्याने त्यांना जमावाने अडवून मारहाण केली होती. याप्रकरणी जाधव यांना अटक केली होती. मात्र, त्यांची तक्रार पोलिसांनी घेतली नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सीआरपीसी १५६( ३) नुसार गुन्हा दाखल करुन तपास करण्याचा आदेश दिला आहे.

याप्रकरणी हर्षवर्धन जाधव यांच्या महिला सहकार्यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादी यांनी कार पार्क केली असताना कारचा दरवाजा उघडला असताना पाठीमागून अजय चड्डा व ममता चड्डा यांनी धडक देऊन मोठ्याने आरडून फिर्यादी यांच्या चारित्र्यावर शिवीगाळ केली. अजय चड्डा यांनी फिर्यादी यांचा विनयभंग करुन थोबाडीत मारली. त्यानंतर फिर्यादी व हर्षवर्धन जाधव औंध चौकात गेले असताना त्यांची गाडी अडवून गाडीची चावी जबरदस्तीने काढून घेतली. जाधव यांना खाली खेचून मारहाण करुन त्यांच्या डोक्यात राॅडने व काठीने मारा असे म्हणून लोकांच्या गर्दीतून एक अनोळखी माणसाने येऊन फिर्यादी यांना कारमध्ये बसवून अपहरण करुन अमन चड्डा, करण चड्डा व मनीष आनंद यांनी लैंगिक अत्याचार करुन फिर्यादी यांना रॉड, काठी व इतर शस्त्राने मारहाण करुन तसेच जाधव यांना मारहाण करुन त्यांचा कुर्तामध्ये हात टाकून व पँट काढण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांचा आय फोन तोडून गाडीवर रॉडने मारले. असे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधव