Crime: बदलापुरात तरुणावर गावगुंडांचा गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 09:11 IST2022-08-29T09:10:46+5:302022-08-29T09:11:03+5:30

Crime: बदलापुरात चिकनचे दुकान चालवणाऱ्या एका तरुणावर सहा ते सात जणांच्या गटाने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या तरुणावर गावगुंडांनी गोळीबारही केला.

Crime: Village goons fired on a youth in Badlapur | Crime: बदलापुरात तरुणावर गावगुंडांचा गोळीबार

Crime: बदलापुरात तरुणावर गावगुंडांचा गोळीबार

बदलापूर : बदलापुरात चिकनचे दुकान चालवणाऱ्या एका तरुणावर सहा ते सात जणांच्या गटाने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या तरुणावर गावगुंडांनी गोळीबारही केला. या गोळीबारातून हा तरुण थोडक्यात बचावला आहे. पोलिसांना टिप देत असल्याचा संशय मनात ठेवून हा हल्ला करण्यात आल्याचे संबंधित तरुणाने स्पष्ट केले आहे.
    बदलापूर गावातील कैफ शेख याचे गावातच चिकनचे दुकान आहे. तो शनिवारी रात्री बोराड पाड्यावरून बदलापूर गावाच्या दिशेने येत होता.   बदलापूर गावाच्या वेशीवरच गाड्यांतून आलेल्या अमन सिंग, सचिन खंडागळे, शेखर गडदे, पाठक बिल्डर, लक्ष्मण नवगिरे, रावत्या आणि इतर तीन ते चार जणांच्या गटाने कैफवर हल्ला केला. 

थोडक्यात बचावला 
    हल्ल्यातून कैफ आणि त्याच्या इतर साथीदारांनी वाचण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी हल्लेखोरांपैकी एकाने कैफच्या दिशेने गोळीबारही केला. ही गोळी चुकल्याने त्याचा जीव थोडक्यात बचावला. याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
    तीन वर्षांपूर्वी हल्लेखोरांच्या काही साथीदारांना बेकायदा बंदुकीसह पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याची टिप कैफने दिल्याचा संशय हल्लेखोरांना हाेता.

Web Title: Crime: Village goons fired on a youth in Badlapur